तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीत कु.लक्ष्मी पारधी प्रथम

0
46

आमगाव,दि.२५ः- तालुक्यातील हरिहर भाई पटेल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय चिरचाळबांध येथील बालवैज्ञानिक कु.लक्ष्मी लेखराम पारधी वर्ग ९ वा हिने आमगाव तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीत प्रथम क्रमांक पटकावल्याने तिचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.तालुक्यातील विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन संत जैरामदास हाय.ठाणा येथे करण्यात आले होते. या विज्ञान प्रदर्शनात हरिहरभाई पटेल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय चिरचाळबांध येथील विद्यार्थ्यांनी सहा.शिक्षक लोकेश लांडगे आणि जितु कोरे यांच्या मार्गदर्शनात सहभाग घेतला.यात कु.लक्ष्मी लेखराम पारधी या बालवैज्ञानिक विद्यार्थिनीने तयार केलेल्या प्रयोगाला प्रथम क्रमांक मिळाल्याने मार्गदर्शक शिक्षक आणि बालवैज्ञानिक विद्यार्थिनीचे बहुजन हिताय जगत शिक्षण संस्था गोंदियाचे संस्थापक शिक्षणमहर्षी जे.एस.रांहांगडाले,सचिव एन.एन.येळे,संचालिका विमलताई रहांगडाले,प्राचार्य बन्सीधर शहारे तसेच हरिहर भाई पटेल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय चिरचाळबांध येथील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्व विद्यार्थी यांनी अभिनंदन केले.