तिरोडा:- तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्रात धापेवाडा उपसा सिंचन योजना टप्पा क्र.१ व टप्पा क्र२ कार्यान्वित असून या योजनेचे पाणी खैरबंधा, चोरखमारा, बोदलकसा जलाशयात सोडून लाभक्षेत्रांतर्गत शेतक-यांना रबी धानपिकाकरिता पाणी दिल्या जाते दरम्यान २०१९ पासून खैरबंधा जलाशयात पाणी सोडण्यात येत असून यावर्षीपासून टप्पा क्र.२ चे पाणी चोरखमारा, बोदलकसा जलाशयात सोडल्यामुळे रबी धानपिकाचे क्षेत्र वाढले आहे याकरिता लाभक्षेत्रातील शेवटच्या शेतक-यांच्या शेतात पाणी उपसा सिंचन योजनेचा लाभ शेतक-यांना योग्यरित्या मिळावा याकरिता तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांनी पाटबंधारे विभाग व धापेवाडा उपसा सिंचन योजना या अधिका-यांची संयुक्त बैठक बोलावून पाण्याचे योग्य नियोजन करण्याबाबत निर्देश दिले यामुळे खैरबंधा जलाशयाद्वारे अंदाजे २०० हेक्टर जमीनीला रबी धान पिकाकरिता पाणी मिळणार असून बोदलकसा जलाशयाद्वारे अंदाजे २६० चोरखमारा जलाशयाद्वारे अंदाजे २८० हेक्टर रबी धानपिकाला लाभ होणार आहे यावेळी प्रामुख्याने धापेवाडा उपसा सिंचन कार्यकारी अभियंता अंकुर कापसे, न.प.मुख्याधिकारी राहुल परिहार, उपअभियंता पंकज गेडाम, गोंदिया पाटपंधारे विभाग उपभियंता पटले मा.न.प.सदस्य राजेश गुनेरीया, बाळू येरपुडे व दोन्ही यंत्रणेतील अधिकारी उपस्थित होते.