विद्यार्थ्यांनो स्पर्धत टिकाकायचे असेल तर कठोर परिश्रम करून अभ्यास करा-सरपंच नरेंद्रकुमार चौरागडे

0
40

जी ई एस हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे आनंद मेळावा

गोरेगाव,दि.०२– आजचे युग स्पर्धेचे आहे प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा आहे शालेय शिक्षणासोबतच विविध क्रिडा, सांस्कृतिक , कला असे विविध सुप्त गुण विद्यार्थ्यांमध्ये असतात विधार्थोनो स्पर्धत टिकायचे आहे. तर कठोर परिश्रम करून अभ्यास करून आपले भविष्य उज्ज्वल करावे असे प्रतिपादन सरपंच नरेंद्र कुमार चौरागडे यांनी केले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच नरेंद्र कुमार चौरागडे, उद्घाटक उपसरपंच मोहनलाल पटले, प्रमुख अतिथी प्राचार्य राजेंद्र रहमतकर,जे. डि. शेंदरे,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गोपाळ उके आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी विविध प्रकारचे सांस्कृतिक, बौद्धिक,क्रिडा,भाषण स्पर्धा इत्यादी कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन प्रा जे आर भेडरकर तर आभार दिपक रामटेके यांनी केले. यावेळी रहिले सर, नाकाडे मॅडम,लंजे सर,अशोक नान्हे,जी. एल. रांहागडाले, पटले आदींनी सहकार्य केले.