*राज्यातून गणित विषयासाठी राजेश कोगदे या एकमेव शिक्षकाची निवड*
बुलढाणा,दि.०३ः- ज्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय स्तरावर रसायनशास्त्र, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, शांतता आणि साहित्य या क्षेत्रात विशेष योगदान देणाऱ्यांना नोबेल पुरस्कार दिला जातो.त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्यात भाषा, गणित, विज्ञान,कला, तंत्रज्ञान , आणि विशेष योगदान देणाऱ्या आणि नाविन्यपूर्ण पद्धतींचे विकसन करणाऱ्या केवळ सात शिक्षकांना शिक्षण माझा वसा या नावाने राज्यस्तरीय युवा पुरस्कार शिक्षणविवेक व टि.बी, लुल्ला चॅरिटेबल फाऊंडेशन सांगली यांच्या माध्यमातून दिला जातो.यावर्षी गणित विषयातला शिक्षण माझा वसा हा राज्यस्तरीय युवा पुरस्कार जि प म उच्च प्राथमिक शाळा कदमापूर शाळेतील शिक्षक राजेश वासुदेव कोगदे यांना त्यांनी गणित विषयात विकसित केलेल्या विविध नाविन्यपूर्ण पद्धतींच्या विकासाबद्दल जाहीर झाला आहे. सदर कार्यक्रम पूणे येथे १८जानेवारी २०२५रोजी न्यू इंग्लिश स्कूल, गणेश हॉल येथे मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह व रोख रक्कम देऊन सपत्नीक प्रदान केला जाणार आहे.आई सावित्रीच्या जन्मदिनाला व नव्या वर्षाच्या सुरुवातीला मिळालेली आनंददायी बातमी खूप ऊर्जादायी असल्याचे यावेळी कोगदे म्हणाले.