जि.प.शाळा हिरडामालीचा बालवैज्ञानिक हिमांशू कटरे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शीत प्रथम

0
562
गोरेगाव,दि.११ः श्रीमती सरस्वतीबाई महिला विद्यालय गोंदिया येथे *जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन* दिनांक 9 ते 10 जानेवारी 2025 या कालावधीमध्ये आयोजन करण्यात आले होते.या प्रदर्शनात पीएम श्री जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा हिरडामालीचा बालवैज्ञानिक हिमांशू विजय कटरे या विद्यार्थ्याने *पाणी शुद्धीकरण व पाणी चक्र* या विषयावर विज्ञान शिक्षक सुभाष सोनवाने यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केलेल्या मॉडेलला परीक्षकांनी जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक देऊन विभागीयस्तरासाठी निवड केली आहे.
त्याबद्दल डायटचे प्राचार्य डॉ.नरेश वैद्य,माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ.महेंद्र गजभिये,उपशिक्षणाधिकारी ज्ञानेश्वर दिघोरे ,शिक्षण विस्तार अधिकारी अंबर बिसेन यांच्या हस्ते ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन हे हिमांशूला गौरविण्यात आले.
हिमांशू , त्याचे आई-वडील व मार्गदर्शक शिक्षक श्री.सोनवाने,पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी मधु पारधी,केंद्रप्रमुख स्मिता पटले,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष महेश कुंभलकर व सर्व सदस्य शाळा व्यवस्थापन समिती हिरडामाली तसेच उच्चश्रेणी मुख्याध्यापक रवींद्र शहारेसह सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले .