आमगाव,दि.१२ःतालुक्यातील छत्रपती विद्यालय सितेपारचे वार्षिक स्नेहसंमेलन दिनांक 9 ते 11 जानेवारी 2025 या कालावधीत विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून उत्साहात पार पडले.या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन पंचायत समिती आमगावचे सभापती राजेंद्र गौतम यांच्या हस्ते जि.प.सदस्य हनवंत वट्टी यांच्या हस्ते दीप प्रजलन करुन करण्यात आले.यावेळी जिल्हा परिषद सदस्य किशोर महारवाडे,माजी पंचायत समिती उपसभापती बाबुलाल तुरकर,गटशिक्षणाधिकारी येटरे ,विस्तार अधिकारी ओ.एस.बिसेन तसेच संस्थेचे अध्यक्ष श्रीमती ममता चौधरी,उपाध्यक्ष महेंद्र सूर्यवंशी,सचिव गोपाल फुलबांधे, सहसचिव भरतलाल ताजने,कोषाध्यक्ष योगेंद्र गौतम,ग्रामपंचायतचे सरपंच देवराव बिसेन,पोलीस पाटील उल्हासराव बिसेन, सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष बाळाजी बिसेन,तंटामुक्ती अध्यक्ष कन्हैया बिसेन,उपसरपंच सुरेश चौधरी,माजी सरपंच डॉ.सेवक चौधरी,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गुनेश्वर बिसेन,दिगंबर बिसेन,कमलेश पटले इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
स्नेहसंमेलनाचे समारोप बक्षीस वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा परिषद सदस्य सुरेश हर्षे तर बक्षीस वितरक म्हणून जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.कांतीलाल पटले,पशुधन विकास अधिकारी डॉ.महेंद्र हरिनखेडे,गोरेगाव तालुका कृषी अधिकारी नरेश हरिणखेडे,तिरोड्याचे गटशिक्षणाधिकारी विनोदकुमार चौधरी,सेवानिवृत्त प्राचार्य सी.बी.बिसेन,ग्रामपंचायत सरपंच देवराव बिसेन,पोलीस पाटील उल्हासराव बिसेन,सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष बाळाजी बिसेन,तंटामुक्ती अध्यक्ष कन्हैया बिसेन,उपसरपंच सुरेश चौधरी,माजी सरपंच डॉ सेवक चौधरी,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गुनेश्वर बिसेन,पेंटर युनियनचे जिल्हाध्यक्ष घनश्याम रहांगडाले,दिगंबर बिसेन,कमलेश पटले,डॉ. सुधीर बिसेन माजी तंटामुक्ती अध्यक्ष,राशन दुकानदार टेकचंद हरीणखेडे, सेवानिवृत्त शिक्षक खेमराज हरीणखेडे, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन सहाय्यक शिक्षक ओ.एम.बोपचे यांनी केले तर आभार प्रदर्शन कु.बी.एस.मेश्राम सांस्कृतिक प्रमुख यांनी मानले.तीन दिवसीय स्नेहसंमेलन कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता मुख्याध्यापक एम.एस.पटले,सहाय्यक शिक्षक ओ.एम.बोपचे,आर.एस.जयतवर,जे.डी.कटरे,कु.बी.एस.मेश्राम,एस.एम.सूर्यवंशी,एल.सी.नागपुरे,शिक्षकेतर कर्मचारी व्ही. आर.बिसेन,व्ही.आर.मरकाम,एल.एम.मेश्राम,आर.आर.पटले,के.बी.कावळे यांनी अथक प्रयत्न केले.