41.3 C
Gondiā
Saturday, June 13, 2026
Home शैक्षणिक हॅकाथॉन प्रदर्शनीमध्ये पंचशील विद्यालयातील विद्यार्थिनींची राज्यस्तरावर निवड

हॅकाथॉन प्रदर्शनीमध्ये पंचशील विद्यालयातील विद्यार्थिनींची राज्यस्तरावर निवड

0
267

blank

अर्जुनी मोरगांव,दि.१२ः तालुक्यातील पंचशील विद्यालय बाराभाटी येथील विद्यार्थिनी आराध्या हेमंत रंगारी व दिव्या रूपचंद बागडे या इयत्ता सातवीतील दोन विद्यार्थिनींची एन.एस नंदागवळी सहाय्यक शिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली नाविन्यपूर्ण मॉडेल आणि उत्कृष्ट सादरीकरणामुळे हॅकाथॉन प्रदर्शनी मध्ये राज्यस्तरावर निवड झाली.

दिनांक ११ जानेवारी २०२५ रोजी मनोहरभाई मुंसिपल स्कूल, गोंदिया येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय हॅकाथॉन प्रदर्शनीमध्ये पंचशील विद्यालयातील विद्यार्थिनींनी वाहतूक व दळणवळण विषयाशी संबंधित नाविन्यपूर्ण सेंसरयुक्त कार या मॉडेलच्या आधारे आजच्या परिस्थितीत होणाऱ्या अपघातावर नियंत्रण घालता येतो याचे उत्कृष्ट सादरीकरण केल्यामुळे तालुक्यातून प्रथम क्रमांक व जिल्ह्यातून द्वितीय क्रमांक पटकाविल्याने पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय हॅकाथॉन प्रदर्शनी करिता निवड करण्यात आली.

दिनांक ९ व १० जानेवारी २०२५ रोजी पार पडलेल्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीमध्ये पंचशील विद्यालयातील सहायक शिक्षक एस.सी पुस्तोडे यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता दहावीतील विद्यार्थिनी देवयानी दिलीप किरसान या विद्यार्थिनीचे आदिवासी गटातून जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकाविल्यामुळे राज्यस्तरावर निवड झाली. तसेच पुन्हा लगेच दुसऱ्या दिवशी दिनांक ११ जानेवारी २०२५ रोजी झालेल्या हॅकाथॉन प्रदर्शनीमध्ये सहाय्यक शिक्षक एन एस नंदागवळी यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता सातवीतील विद्यार्थिनी आराध्या हेमंत रंगारी व दिव्या रूपचंद बागडे या विद्यार्थ्यांची राज्यस्तरावर निवड झाल्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक व्ही.एम चव्हाण व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यासह शाळा परिसरातील पालकवर्ग विद्यार्थिनी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन तसेच प्रशंशा करीत आहेत.