हॅकेथॉन’ सारख्या उपक्रमांतून भविष्यातील वैज्ञानिक घडणार – एम. मुरुगानंथम

0
78

जिल्हास्तरीय हॅकेथॉन प्रदर्शनी उत्साहात संपन्न; जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, गोंदियाचे आयोजन.

गोंदिया,दि.12 जाने.: विद्यार्थ्यांमध्ये नवनिर्मितीची मानसिकता निर्माण करण्यासाठी २१ व्या शतकातील कौशल्याची रुजवणूक व्हावी म्हणून राज्य शासनाच्या निर्देशानुसार शालेय शिक्षण विभागाने STARS प्रकल्पांतर्गत Hackathon या उपक्रमाचे इयत्ता ६ वी ते ८ वी च्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन नोंदणी करून घेतली होती. नोंदणी केलेल्या प्रतिकृतींचे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे यांच्या निर्देशानुसार (दि.11) ला जिल्हास्तरीय प्रदर्शनी स्थानिय पी.एम.श्री मनोहर म्युंनसिपल हायस्कूल येथे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गोंदिया च्या वतीने उत्साहात संपन्न झाली. त्यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना व शिक्षकांना मार्गदर्शन करतांना ‘हॅकेथॉन’ सारख्या उपक्रमांतून भविष्यातील वैज्ञानिक घडणार असल्याचे प्रतिपादन केले.

याप्रसंगी जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. नरेश वैद्य, प्रमुख अतिथी मध्ये जिल्हा परिषद गोंदिया चे माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. महेंद्र गजभिये, पंचायत समिती गोंदियाचे गटविकास अधिकारी आनंद पिंगळे, उपशिक्षणाधिकारी अशोक लांडे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या अधिव्याख्याता पुनम घुले, पंचायत समिती सालेकसाचे गटशिक्षणाधिकारी विशाल डोंगरे, अर्जुनी मोर चे गटशिक्षणाधिकारी अनिल चव्हाण, जिल्हा परिषद गोंदियाचे शिक्षण विस्तार अधिकारी एन. जी डहाके, श्रीमती पौर्णिमा विश्वकर्मा, पीएमश्री मनोहर मुन्सिपल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य आर. जे. डिसूजा हे उपस्थित होते. उपस्थित पाहुण्यांचे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पदमपूर येथील शिक्षक विजयकुमार वालोदे यांनी आपल्या मधूर बासरी वादनाने स्वागत केले. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम यांचे स्वागत पुस्तक देवून प्राचार्य डॉ. नरेश वैद्य यांनी केले.

‘हॅकेथॉन’ या उपक्रमात जिल्ह्यातील एकूण 387 शाळांनी ऑनलाईन सहभाग घेतला होता. त्यामुळे गोंदिया जिल्हा राज्यात 7व्या क्रमांकावर होता. त्यापैकी जिल्हास्तरीय प्रदर्शनीला उत्कृष्ट 150 शाळांना तालुकानिहाय बोलविण्यात आले होते. या प्रदर्शनीमध्ये विविध प्रकारचे मॉडेल्स विद्यार्थ्यांनी तयार करून आणले होते. प्रत्येक शाळेतील दोन विद्यार्थी व एक मार्गदर्शक शिक्षक असे आज एकूण 450 व्यक्ती उपस्थित होते. हॅकेथॉन या उपक्रमांतर्गत NEP २०२०, NCF २०२३, UN SDG यानुसार १५ विषयांतर्गत (Themes) विद्यार्थ्यांनी प्रतिकृती तयार केल्या होत्या. हॅकेथॉन या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेबाबत जागृती करून विद्यार्थ्यांनी स्थानिक ते जागतिक स्तरावरील समस्या सोडविण्यासाठी प्रतिकृती तयार करून आणल्या होत्या.

जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे प्रास्ताविक अधिव्याख्याता पुनम घुले यांनी करून या उपक्रमाचा उद्देश, व्याप्ती व भविष्यातील महत्त्व विशद केले. प्रदर्शनी मध्ये ठेवण्यात आलेल्या प्रतिकृतींचे एकूण दहा परीक्षकांनी परीक्षण करून तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय मूल्यांकन केले. या परीक्षकांमध्ये डीएड कॉलेज गोंदियाचे अध्यापकाचार्य दिलीप पडोळे, टीना ठाकरे, माध्यमिक विज्ञान शिक्षक असीम बॅनर्जी व गणित शिक्षक सुभाष मारवाडे, विज्ञान शिक्षिका अनिता तुरकर, ‘हॅकेथॉन’चे राज्यस्तरीय तज्ज्ञ साधन व्यक्ती प्रदीप शरणागत, पदवीधर शिक्षक सुनील अंबुले, प्राथमिक विज्ञान शिक्षक लोकेश चौरावार यांनी परीक्षण केले. त्यामध्ये जिल्हास्तरीय प्रथम पारितोषिक गोंदिया तालुक्यातील भानपूर हायस्कूल भानपुर, द्वितीय पारितोषिक अर्जुनी मोर तालुक्यातील पंचशील विद्यालय बाराभाटी तर तृतीय पारितोषिक तिरोडा कीतालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सातोना यांनी पटकावले. सर्व विजेत्या विद्यार्थी व शिक्षक यांना उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देण्यात आले. जिल्हास्तरीय तिन्ही क्रमांकाच्या प्रतिकृती या राज्यस्तरावर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. कार्यक्रमाचे संचालन जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा अदासीचे शिक्षक मुकेश रहांगडाले यांनी केले तर आभार प्रदर्शन साधनव्यक्ती वशिष्ठ खोब्रागडे यांनी मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गोंदिया कार्यालयातील लेखापाल अमोल भगत, तंत्रज्ञ कुणाल तभाने, BRC गट समन्वयक धनवंत कावळे, टी. एम. राऊत, प्रदीप शरणागत, सर्व तालुक्यातील साधनव्यक्ती मंगला बडवाईक, उर्मिला वैद्य, कुमुदिनी घोडेस्वार, खुमेश कटरे, कविता नागपुरे, शारदा जिभकाटे, रवि पटले, बी. डी. चौधरी, देविदास हरडे, सुनील राऊत, प्रदीप वालदे, ज्योती पारधी, नरेंद्र बारेवार, शालिनी रहांगडाले, सतिश बावनकर, विजयकुमार लोथे, सी. जे. ढोके, मनोहर म्युंसिपल हायस्कूल येथील सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मेहनत घेतली.