भाकरोंडी आश्रम शाळेच्या मुलीची राज्य स्तरीय क्रीडास्पर्धेत उंच भरारी

0
41

आरमोरी- शासकीय माध्यमिक आश्रम शाळा भाकरोंडी ता. आरमोरी जिल्हा गडचिरोली येथील विद्यार्थिनी कुमारी सोनी लहीराम तुलावी इयत्ता नववी ही विद्यार्थिनी आदिवासी विकास विभागांतर्गत नागपूर येथे घेतलेल्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत 14 वर्षीय वयोगटामध्ये गोळा फेक या क्रीडा प्रकारांमध्ये गोल्ड मेडल जिंकून आपल्या शाळेचे व आपल्या पालकांचे नाव लौकिक केले . यामूळे शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना तिचे यश प्रेरणादायी ठरणारे आहे, व भाकरोंडी आश्रम शाळेसाठी ही मोठी गौरवाची बाब आहे. यामध्ये मार्गदर्शक मुख्याध्यापक डी.जी.डोंगरे,गेडाम सर,मेश्राम सर कु चांदेकर मॅडम, बारसागडे मॅडम,बोरकर सर, भाकरे सर,धनविजय सर, गेडाम मॅडम, ढोरे मॅडम , म्हशाखेत्री सर, वैद्य सर इत्यादींचे मार्गदर्शन लाभले.