मॉडेल कॉन्व्हेंट एंड विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात दोन दिवसीय स्नेहसंमेलन

0
97
गोरेगांव : मॉडल कॉन्व्हेन्ट एन्ड विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय गोरेगांवमध्ये दोन दिवसीय प्रतिबिंब वार्षिक स्नेहसंमलनाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जगत महाविद्यालयाचे उपप्राचार्य एस. एच. भैरम होते. उद्घाटन पोलिस निरीक्षक अजय भुसारी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून पोउपनि श्रीमती प्रीती लांडे, मॉडले कॉन्व्हेंटचे सचिव आर. डी. कटरे, संचालिका सुरेखा आर. कटरे, आर. आर. अगडे, राहुल कटरे, सुनील आवळे, प्रफुल भालेराव, वैभव कटरे, कु. दीप्ती कटरे, वाहिधे, दामेश्वर बोपचे, भरत तुप्पट, मुकेश तुमलाम, मुनेश्वर येळणे, श्रीमती कविता लीचडे आदि मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात भारत माता, माता सरस्वती, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व मार्त्यापण करून दिप प्रज्वलनाने करण्यात आली. यानंतर पोनि अजय भुसारी यांच्या हस्ते फीत कापून कार्यक्रमाचे उ‌द्घाटन करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते पोनि भुसारी यांचा शाल, श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे शाळेला प्रगती शिखरावर पोहोचविण्यात मोलाचा वाटा असलेल्या शिक्षकांचा सत्कार करण्यात
आला. शाळेत १०० टक्के उपस्थिती असलेले विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह देवून गौरविण्यात आले.
प्रतिबिंब वार्षिक स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी कला सादर करत रंगारंग कार्यक्रम प्रस्तुत केले. मराठी नृत्य, लावणी, कोळी नृत्य, आजच्या काळात शोशल मीडिया मुळे होणारे नुकसान यावर प्रस्तुती सादर केली. कार्यक्रमाचे संचालन विद्यार्थिनी कु. निधी राहुल कटरे व निषाद चंदनकुमार पटले तर आभार कु. तृप्ती विजयकुमार दानी हिने मानले.
कार्यक्रमाला माजी मुख्याध्यापक रविकांत लांजेवार, महाराष्ट्र बँकेचे शाखा व्यवस्थापक अभय कसारे, बुलढाणा अर्बन बँकेचे व्यवस्थापक अंकुश चौहान, प्राचार्य छाया पी. मेश्राम, प्रशासकीय अधिकारी सी. बी. पटले, सविता इळपाचे, श्रीमती नमिता मुनेर्श्वर कटरे, शालू कुंभरे व कर्मचारी उपस्थित होते.