उपक्रम शिक्षक समितीचा, विद्यार्थ्यांच्या उत्कर्षाचा
गोंदिया,दि.१८ः “सामूहिक प्रयत्नातून शैक्षणिक समृद्धतेकडे” या तत्वानुसार महा. राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा अर्जुनी/मोर च्यावतीने दरवर्षीप्रमाणे जिल्हा परिषद शाळांच्या विद्यार्थ्यांची “नवोदय प्रवेश परीक्षा 2025″* ची पूर्वतयारी होण्याच्या दृष्टीने शिक्षणप्रेमी शिक्षक व पालकांच्या मदतीने नवोदय सराव परिक्षेचे आयोजन करण्यात आले होते.ही सराव परीक्षा 29 डिसेंबर 2024 पासून 12 जानेवारी 2025 या कालावधीत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अर्जुनी/मोर क्र.१ येथे घेण्यात आली.
यात पंचायत समिती अर्जुनी/मोर अंतर्गत जिल्हा परिषद व खाजगी व्यवस्थापन शाळांनी सहभाग घेतला. सुमारे 250 विद्यार्थी या सराव परीक्षेत सहभागी झाले होते.सराव परीक्षेच्या समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक विनोद मेश्राम होते.तर प्रमुख अतिथी एन.एस.लंजे,विजय गावराने,योगेश कापगते,तेजस्वी कापगते यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत मुख्य परीक्षेकरिता शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिलीप लोदी यांनी केले.सूत्रसंचालन श्रीकृष्ण कहालकर तर आभार नरेंद्र बनकर यांनी मानले. यावेळी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना भेटवस्तू व खाऊचे वाटप करण्यात आले.
नवोदय सराव मालिकेच्या आयोजनाबद्दल पं. स. अर्जुनी/मोरचे गटशिक्षणाधिकारी अनिल चव्हाण,शिक्षण विस्तार अधिकारी एन.एस.लंजे,बी.डब्ल्यु. भानारकर यांनी शिक्षक समिती शाखा अर्जुनी मोर व सर्व समिती शिलेदारांचे अभिनंदन केले.
सदर नवोदय परीक्षा सराव मालिकेच्या आयोजनाकरीता शिक्षक समितीचे विभागीय अध्यक्ष किशोर डोंगरवार, जिल्हाध्यक्ष संदीप तिडके, सरचिटणीस संदीप मेश्राम, दिलीप लोदी , विनोद बडोले, श्रीकृष्ण कहालकर, गोपाल गायकवाड, पी ए कापगते, यांच्या मार्गदर्शनात म. रा. प्राथ. शिक्षक समितीचे तालुका अध्यक्ष श्री आशिष कापगते, सरचिटणीस रेवानंद उईके, प्रसिद्धी प्रमुख नरेंद्र बनकर उपाध्यक्ष देवेंद्र देशकर, ओमप्रकाश मस्के, सुभाष मानकर, चंद्रकांत डोंगरवार,विनोद गहाने, केशव कोल्हे, देवेंद्र नाकाडे, नरेंद्र शहारे, सुनील बडोले, नेतराम मलगाम, मंगेश पर्वते, विलास पाऊलझगडे, यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आली. प्रश्नपत्रिका व सराव संच निर्मिती करिता श्री एम पी म्याकलवार, श्री अरुण टेंभुरकर , नरेंद्र बनकर, नरेंद्र अमृतकर, विनोद गहाने, संजय मस्के, युवराज नागपुरे, उमेश तूमरामे यांचे विशेष सहकार्य लाभले . सराव मालिका यशस्वी आयोजनासाठी आर के कापगते, विनोद चीचमलकर, सू मो भैसारे, महेंद्र कोहाडकर, जितेंद्र ठवकर, राजेश तिरगम, राजेंद्र राखडे, आर एस संग्रामे, एच के मानापुरे, गोपाल मंडल, माणिक नंदनवार , भागवत गहाने, नरेश प्रधान, पी टी गहाने, प्रमोद कापगते, प्रमोद चाचेरे, किशोर लंजे, नरेश लंजे, राजेश मरघडे, सपना श्यामकुवर संगीता नवखरे, किरण लाडे, सुप्रिया कांबळे, वनिता झोळे, नरेश परशुरामकर, मोरू राऊत, शिशुपाल अमले, गोविंद बगडे, सचिन गायधने, विलास मुंगमोडे, प्रकाश सांगोळे, प्रशांत गजभिये, खेमराज मंगर व समिती शिलेदार यांचे सहकार्य लाभले.
आपल्या विद्यार्थीप्रेमी व विशेषतः एखाद्या शाळापयोगी कामांसाठी तन – मन – धनाने स्वतःला झोकुन देण्याच्या वृत्तीची लोकं एकत्र आली तर एखादे शैक्षणिक उपक्रम कसे यशस्वी होऊ शकते, याचे उत्तम उदाहरण शिक्षक समिती व शिक्षणप्रेमी मित्रमंडळींनी यशस्वी केलेली नवोदय सराव मालिका होय.अनिल चव्हाण गटशिक्षणाधिकारी पं.स.अर्जुनी/मोर