पंचशील विद्यालयात कापीमुक्त अभियान अंतर्गत विविध कार्यक्रम

0
34

अर्जुनी मोरगांव :* तालुक्यातील पंचशील विद्यालय बाराभाटी येथे कॉपीमुक्त अभियानांतर्गत दि.२० जानेवारी २०२५ ते २६ जानेवारी २०२५ पर्यंत घ्यावयाचे कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडले.

दिनांक २० जानेवारी २०२५ रोजी शाळेचे मुख्याध्यापक व्ही.एम चव्हाण यांनी शिक्षकांची सभा आयोजित करून कॉपीमुक्त अभियानाबाबत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्या परिपत्रकाविषयी सविस्तर मार्गदर्शन करून जबाबदारी सोपविली. त्यानुसार दि.२१ जानेवारी ला परिपाठाच्या वेळेस परीक्षा प्रमुख एन.पी समर्थ यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेत कोणताही गैरमार्गाचा अवलंब करणार नाही यावर आधारित शपथ दिली. दि.२२ जानेवारी रोजी सहायक शिक्षक ए.डी घानोडे व क्रीडा प्रमुख आर.डी कोल्हारे यांनी शाळा स्तरावर मंडळ शिक्षा सूची, उत्तर पत्रिका व प्रवेश पत्रिकेवरील सूचना तसेच गैरमार्ग केल्यास होणाऱ्या परिणामांची जाणीव या विषयावर इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. दि.२३ जानेवारी रोजी आयसेक्ट कॅम्पुटर एज्युकेशन सेंटर अर्जुनी मोरगाव चे संचालक भूपेंद्र बिसेन यांनी परीक्षा काळात विद्यार्थ्यांनी घ्यावयाचा आहार व आरोग्याची काळजी याबाबत ऑल इंटिरिऍक्टिव्ह बोर्ड वर पि.पी.टी च्या सहाय्याने सविस्तर मार्गदर्शन केले.

तसेच शाळेत दिनांक २४ ते २७ जानेवारी २०२५ पर्यंत वार्षिक स्नेहसंमेलन असल्यामुळे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ च्या वतीने कॉफीमुक्त अभियानांतर्गत आयोजित उर्वरित कार्यक्रम सुद्धा दि.२३ जानेवारी रोजी घेण्यात आले. सहाय्यक शिक्षक एस.सी पुस्तोडे, एल.एम पाटणकर व एन.एस नंदागवळी यांच्या मार्गदर्शनाखाली कॉपीमुक्त अभियानाच्या जागृतीसाठी कॉपीमुक्ती घोषवाक्य सह शाळा परिसरात जनजागृती फेरी काढण्यात आली. तसेच ज्येष्ठ शिक्षक डी.एच मेश्राम व टी.के भेंडारकर यांनी पालक-शिक्षक व शाळा व्यवस्थापन समितीच्या उपस्थितीत इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांना परीक्षेला सामोरे जाताना अभ्यासाची तयारी व परीक्षा तणावमुक्त वातावरणात कशी देता येईल या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. त्याचबरोबर ऑल इंटिरिऍक्टिव्ह बोर्ड च्या सहाय्याने उत्तर पत्रिका कशाप्रकारे लिहाव्यात यावर आधारित चित्रफित विद्यार्थ्यांना दाखवण्यात आली. मुख्याध्यापकांचे उत्तम नियोजन व सर्व शिक्षकांच्या सहकाऱ्यांनी कॉपीमुक्त अभियान अंतर्गत परीक्षा मंडळामार्फत विविध कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यात आले.