एक्युट पब्लिक स्कूल येथे गणतंत्र दिन साजरा

0
79

गोंदिया –येथील एक्युट पब्लिक स्कूल येथे संजय भास्कर सचिव संजोत बहुउद्देशीय संस्था यांच्या अध्यक्षतेखाली गणतंत्र दिन कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी श्रीमती शुभा शहारे सहसचिव संजोत बहुउद्देशीय शिक्षण संस्था, श्रीमती नंदा राऊत मुख्याध्यापिका अक्युट पब्लिक स्कूल गोंदिया, व एकता पटले, मुखाद्यापिका रोझी किड्स कान्वेंट रावणवाडी, योगेंद्र रहांगडाले, अशोक खरवडे सर उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला ध्वज फडकावून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर अतिथी द्वारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रपिता महात्मा गांधी ,यांच्या प्रतिमेला मल्यार्पण करण्यात आले.
त्यानंतर विद्यार्थिनी द्वारे देशभक्तीपर गीत गायन करण्यात आले.नंतर कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख वक्ते यानी गणतंत्र दिवसा बद्दल माहिती सांगितले, सैनिकी परीक्षणाचे देखावे बालनाट्यद्वारे प्रदर्शित करण्यात आले. त्यानंतर मुलगी शिकवा मुलगी वाढवा या विषयावर नाट्याद्वारे प्रस्तुती करण्यात आली. त्यानंतर बक्षीस वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरिता बिसेन व रोशनी बरेले यांनी केले,तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शितल खरवडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाकरिता विद्यार्थी शिक्षक,शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.