पंचशील विद्यालयात स्नेहसंमेलन मोठया उत्साहात

0
42

अर्जुनी मोरगांव :* तालुक्यातील बाराभाटी येथील पंचशील विद्यालयात नुकतेच तीन दिवसीय स्नेहसंमेलन मोठ्या थाटात पार पडले .दि.२४ ला मनोरंजनात्मक खेळाचा कार्यक्रम अनिल कांबळे सेवानिवृत्त मुख्याध्यापक यांच्या अध्यक्षतेखाली व ताराचंद साऊस्कार यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या आनंदात पार पडला. दि.२६ जानेवारी ला शालेय विद्यार्थ्यांचे विविध स्वरूपाचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले . सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्था सहसचिव धम्मदीप रामटेके तर उद्घाटक किशोर बेलखोडे उपसरपंच ग्रामपंचायत बाराभाटी, सरस्वता चाकाटे सरपंचा बाराभाटी , तुलाराम मारगाये अध्यक्ष आदि.सोसायटी कुभिटोला/बाराभाटी, भिमराव चर्जे सरपंच कुंभिटोला, मोरेश्वर सौंदरकर माजी सरपंच कुंभीटोला, हेमलता खोब्रागडे पोलीस पाटील बाराभाटी व परीसरातील मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. मान्यवरांच्या स्वागत सोहळा नंतर शाळेचे मुख्याध्यापक व्ही.एम चव्हाण यांनी प्रास्ताविकाच्या माध्यमातून शाळेची यशोगाथा सर्वांपुढे मांडली. शाळेचे माजी विद्यार्थी तथा मा फाउंडेशनचे संचालक ताराचंद साऊस्कार यांनी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक व खेळाचे २० हजार रुपयांचे साहित्य दिले. तर विश्लेष कपूरचंद नशिने रेल्वे कॉन्ट्रॅक्टर यांनी दहा हजार रुपये किमतीचे होम थेटर आणि आयसेक्ट कम्प्युटर एज्युकेशन चे संचालक दृपेंद्र बिसेन यांनी इंटरऍक्टिव्ह बोर्ड करिता इन्वर्टर दिले. तसेच मान्यवरांच्या मार्गदर्शनानंतर सप्तरंग कलेचे या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या विविध कलेचे प्रदर्शन केले.

दि.२७ जानेवारी ला बक्षिस वितरण-सत्कार सोहळा व महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटिका सरस्वता चाकाटे सरपंच ग्रा.पं बाराभाटी, अध्यक्ष संस्थेचे सचिव अशोक रामटेके, विशेष अतिथी मनोहर कांबळे, आनंद रामटेके, शेखर भालाधरे, पद्माकर रंगारी व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटनानंतर सांस्कृतिक प्रमुख टी.के भेंडारकर यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर संस्था सचिव अशोक रामटेके यांचे शाळेच्या वतीने मुख्याध्यापकांनी समस्त कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सन्मानचिन्ह देऊन सत्कार केले.
तसेच शाळेतील सहायक शिक्षक ए.डी घानोडे यांचा आदर्श शिक्षक तर एस सी पुस्तोडे यांचा अष्टपैलू शिक्षक म्हणून आणि सचिन सोनटक्के यांचा कार्यतत्पर व कर्तव्यनिष्ठ परीचर म्हणून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येरंडी/देवलगांव येथील सेवानिवृत्त शिक्षक एस.व्ही ब्राह्मणकर व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाराभाटी येथील सेवानिवृत्त शिक्षक आर.जे वालोदे यांचे संस्था व शाळेच्या वतीने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यादरम्यान शाळाबाह्य व शाळांतर्गत विविध स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व बक्षीस म्हणून शैक्षणिक साहित्य देऊन गौरविण्यात आले. यानंतर महिला पालकांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम पद्माताई राठोड माजी सरपंचा कुभिटोला/ बाराभाटी यांच्या अध्यक्षतेखाली व पं.स सदस्य शालिनी डोंगरवार, सरपंच पंचशिला मेश्राम ग्रा.पं सुकळी/खैरी, पूजा नशिने, शुभांगी राखडे या व आदी प्रतिष्ठित महिलांच्या उपस्थितीत पार पडला. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहायक शिक्षिका ज्ञानेश्वरी भैसारे यांनी केले. यादरम्यान मोठ्या प्रमाणात उपस्थित महिलांनी नृत्य व गमतीदार उखाणे सादर केले यामुळे कार्यक्रमाची रंजकता अधिकच वाढली. परीसरमध्ये पंचशील विद्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमाचे खूप कौतुक होत आहे. उपस्थितांसाठी चहा व नास्ता देण्यात आला. कार्यक्रमाचे मुख्य संचालन सहाय्यक शिक्षक ए डी घानोडे तसेच बक्षीस वितरणाचे संचालन सांस्कृतिक प्रमुख टी.के भेंडारकर, क्रीडा प्रमुख आर.डी कोल्हारे व परीक्षा प्रमुख एन.पी समर्थ यांनी केले. तर सहाय्यक शिक्षक जे.एम दोनाडकर यांनी सर्वांचे आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सहाय्यक शिक्षक एन.एस नंदागवळी व एल.एम पाटणकर तसेच इतर सर्व कर्मचारीवर्गाने खूप मदत घेतली. वंदे मातरम नी कार्यक्रमाची सांगता झाली.