विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात समाजाची प्रेरणा अनिवार्य – शाखा अध्यक्ष कैलास हांडगे

0
65

विविधरंगी स्नेहसंमेलन पीएमश्री जि.प.शाळा निमगाव येथे संपन्न
अर्जुनी मोरगाव: अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नामांकित पीएमश्री जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा निमगाव येथे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून 25 जानेवारीला विद्यार्थ्यांच्या कलागुणांकरिता सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते,या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेचे शाखा अध्यक्ष कैलास हांडगे हे होते.
यानिमित्त शाळेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता विविध क्रीडा स्पर्धाचे व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन 20 जानेवारीपासून करण्यात आले होते.
‘विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासासाठी क्रीडा स्पर्धेची जशी आवश्यकता तशीच सर्वांगीण विकासासाठी समाजाची प्रेरणा अत्यंत महत्त्वाची असते, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना हेरून त्यांना त्या क्षेत्रात चालना देण्यासाठी समाजाने पुढाकार घ्यावा’असे कैलास हांडगे यांनी यावेळी सांगितले, ते अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटन शाखाध्यक्ष विनोद बडोले यांनी केले, यावेळी केंद्रप्रमुख गोपाळ गायकवाड, दिलीप लोधी, बाळकृष्ण ब्राह्मणकर, हंसराज खोब्रागडे, उमेश ठाकरे, ज्ञानेश्वर कोल्हे, आशिष कापगते, चुन्नीलाल राऊत हे प्रमुख अतिथी उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक देवेंद्र नाकाडे, शिक्षक मुंगमोडे ,गोविंदराव बगडे,उदाराम कापगते, प्रीती चुन्ने, निता भुरे, स्मिता कापगते, तसेच निमगाव ग्रामवाशीयांनी परिश्रम घेतले, या कार्यक्रमाचे संचालन उदाराम कापगते व आभार देवेंद्र नाकाडे यांनी मानले.