जि. प. वरिष्ठ प्राथमिक शाळा, डोंगरगाव (ख.) येथे त्रिदिवशीय वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न

0
657

 अनेक दानशुरांनी केली शाळेला मदत. शाळेतील माजी विद्यार्थ्यांचा शाळेच्या वतीने सत्कार

सडक अर्जुनी,दि.०४ः– जि. प. वरिष्ठ प्राथमिक शाळा, डोंगरगाव (ख.) येथे दि. 28, 29, व 30 जानेवारी 2025 ला त्रिदिवशीय वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन  लायकराम भेंडारकर अध्यक्ष जि. प. गोंदिया यांच्या हस्ते तर दिपप्रज्वलन डॉ. भुमेश्वर पटले जि. प. सदस्य यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी  सौ. पौर्णिमाताई गणविर तर प्रमुख अतिथीस्थानी मंगेश काळे पोलीस निरीक्षक डुग्गीपार,किशोर डोंगरवार,किशोर बावनकर,निकेश भेंडारकर अध्यक्ष तथा सर्व सदस्य शाळा व्यवस्थापन समिती डोंगरगाव,ज्ञानेश्वर खोटेले उपसरपंच तथा सर्व ग्राम पंचायत सदस्य डोंगरगाव तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक व पालकवर्ग होते. शाळेचे उ. श्रे. मुख्याध्यापक एम. व्ही. येरणे यांनी आपल्या प्रास्ताविकेतून शाळेच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल तसेच शाळेच्या प्रगतीविषयी माहिती दिली.जि. प. अध्यक्ष यांनी आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी, सुप्त कलागुणांना वाव मिळण्यासाठी स्नेहसंमेलन हे प्रभावी माध्यम आहे, असे म्हटले. . पौर्णिमाताई गणविर यांनी शाळेच्या विकासासाठी ग्रामपंचायत कटिबद्ध असल्‌याची कबुली दिली.तसेच शाळेतून उत्कृष्ट विद्यार्थी घडवावे अशी अपेक्षा व्यक्त केली.त्रिदिवशीय स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांच्या विविध मनोरंजनात्मक स्पर्धाचे, बाल आनंद मेळाव्याचे, तसेच 100% विद्यार्थ्यांना सहभागी करून दोन दिवस विविध संस्कृतिक कार्यकामांचे आयोजन करण्यात आले. गावातील चारही अंगणवाडीतिल मुलांना सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी करण्यात आले. तसेच गावातील सर्व महिलांसाठी हळदी कुंकवाचे आयोजन करून जवळपास 450 महिलांना वाण वाटप करण्यात आले. बक्षिस वितरण चेतनभाऊ वडगाये सभापती पंचायत समिती सडक अर्जुनी, यांच्या हस्ते, तसेच सरपंच उपसरपंच तथा सर्व ग्राम पंचायत पदाधिकारी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष तथा सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

या कार्यक्रमात नवनियुक्त पंचायत समिती सभापती चेतनभाऊ वडगाये यांचा सन्मानचिन्ह व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. विशेष बाब म्हणजे बक्षिस वितरण प्रसंगी शाळेच्या वतीने शाळेतील माजी 112 विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. ग्राम पंचायत डोंगरगावच्या वतीने 2023 2024 या सत्रातील वर्ग 1 ते 7 विच्या प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यांना पहिल्या क्रमांकास 1001 रु. रोख व सन्मानचिन्ह, दुसऱ्या क्रमांकास 701 रु. रोख व सन्मानचिन्ह, तिसऱ्या क्रमांकास 501 रु. रोख व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. शाळेतील सर्व 160 विद्यार्थ्यांना ग्राम पंचायत तर्फे नोटबूक व स्केल तसेच शाळेतर्फे टिफीन बॉक्स वाटप करण्यात आले.किशोर डोंगरवार यांचेकडून 35000 रु.चे शाळेला प्रवेशद्वार, गावातील महिला बचत गटाकडून 17000 रु.ची ग्रीन मॅट, छत्रपती शिवाजी क्रीडा मंडळ यांचेकडून 5000 रु.ची झाडे, शाळेतील बालवाचनालायसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय तर्फे 5000 रु.ची पुस्तके, दुर्गा उत्सव मंडळाकडून 2100 रु.ची पुस्तके, संगणक कक्षासाठी एकलव्य पुरुष बचत गटाकडून 3001 रु. रोख, माजी विद्यार्थी तसेच ग्रामस्थानीसुद्धा यथाशक्ती शाळेला मदत केली. शाळेच्या वतीने सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशश्वितेसाठी शाळेचे उ. श्रे. मुख्याध्यापक एम. व्ही. पेरणे, जेष्ठ शिक्षकपी. सी. चचाणे, वाय. बी. कापगते,राजेश शेन्डे,जे. डी. म्हशाखेत्री, कु. आर. व्ही. मेश्राम , कु. बी. आर. शेंदरे, एकल एकलव्य शिक्षिका कु, पुजा खोटेले, स्वयंसेवक मा. शुभांगी कठाने तसेच शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक पालक समिती, माता पालक समितीच्या सर्व पदाधिकाऱ्याऱ्यांनी अथक परिश्रम घेतले, कार्यक्रमाची सांगता सर्व विद्यार्थी, पाहुणे व पालकवर्गाच्या स्नेहभोजनाने करण्यात आली.