संतनगरी इंजोरी येथे 5 फेब्रुवारीला भरणार जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचा मेळा

0
54

= जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचा होणार नागरी सत्कार
अर्जुनी-मोर. – निसर्गाचे वरदहस्त लाभलेल्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील संत नगरी इंजोरी येथे गोंदिया जिल्हा परिषदेचे 53 पदाधिकारी व अधिकाऱ्यांचा स्नेह मिलन मेळा ५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी भरणार असून त्यामध्ये जिल्हा परिषदेचे सर्व पदाधिकारी, अधिकारी तथा जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती सभापती उपसभापतीचा सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती गोंदिया जिल्हा परिषदचे नवनिर्वाचित अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी दिली.
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील संतनगरी म्हणून ओळखले जाणारे इंजोरी हे छोटेसे गाव गोंदिया जिल्हा परिषद चे नवनिर्वाचित अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांचे जन्मगाव आणि याच गावात प्रज्ञावंत व गुणवंत विद्यार्थी घडविणारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इंजोरीचे वार्षिक स्नेहसंमेलन 5 फेब्रुवारीला आयोजित असून त्यानिमित्त जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती पदाधिकारी व काही अधिकारी यांचा स्नेह मिलन व सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. सायंकाळी पाच वाजता स्नेहभोजनानंतर शालेय सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन जिल्हा परिषद गोंदिया चे मुख्य कार्यकारी अधिकारी एम मुर्गनाथम यांचे हस्ते, जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांचे अध्यक्षतेखाली, दीप प्रजलवन जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुरेश हर्षे यांचे हस्ते , महिला व बालकल्याण सभापती सविता पुराम, बांधकाम सभापती संजय टेंभरे, कृषी व पशुसंवर्धन सभापती रुपेश कुथे, समाज कल्याण सभापती सौ पूजाताई सेठ व सर्व जिल्हा परिषद सदस्य व पदाधिकारी यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. यानिमित्त जिल्हा परिषदेचे सर्व पदाधिकारी अधिकारी तथा जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती, उपसभापती तथा तालुका स्तरावरील पदाधिकारी व अधिकारी यांचा इंजोरी ग्रामवासी यांचे वतीने नागरी सत्कार सुद्धा होणार आहे. या कार्यक्रमाला निमंत्रितांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर, शाळेचे मुख्याध्यापक विठोबा रोकडे, व सहाय्यक शिक्षक लाकेश्वर लंजे तथा इंजोरी ग्रामवासी यांनी केले आहे.