गोंदिया,दि.२४ः ‘पवित्र पोर्टलद्वारे २०१७ मध्ये निवड झालेल्यांच्या विरोधात काही परिक्षार्थी न्यायालयात गेल्याने निवड झालेल्या शिक्षकांना नियुक्ती मिळू शकली नव्हती.मात्र फेबुवारी २०२५ मध्ये न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला असून गोंदिया जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण विभागात अंदाजे ५-७ शिक्षकांची नियुक्ती पवित्र पोर्टलच्या माध्यमातून झाली आहे.त्या शिक्षक शिक्षिकांना ज्या तालुक्यात सर्वाधिक शिक्षकांची रिक्त संख्या अधिक आहे,त्या तालुक्यात न देता निवड झालेल्या शिक्षकासोंबत वाटाघाटी करीत त्यांच्या इच्छेनुसार गोंंदिया,तिरोडा,गोरेगाव याठिकाणी नियुक्त्या देण्याचा घाट शिक्षण विभागाने रचल्याची चर्चा सुरु झाली आहे.त्यामुळे पारदर्शक व इमानदार कार्याकरीता ओळख असलेले मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती देवरी,सालेकसासारख्या तालुक्यात त्या शिक्षकांना नियुक्तीचे आदेश देतात की शिक्षण विभागातील काहींंनी वाटाघाटीने दिलेल्या तालुक्यात त्या शिक्षकांची नियुक्ती केली जाते याकडे लक्ष लागले आहे.