अर्जुनी-मोर.दि.२४ः तालुक्यातील आदिवासी अतिदुर्गम भाग असलेल्या ईळदा येथील प्रस्तावीत 33/11 के.व्ही.विद्युत उपकेंद्र लवकरच मंजुर करुन शासनस्तरावरून निधी ही उपलब्ध करुन देऊ अशी ग्वाही अर्जुनी-मोर. विधानसभेचे आमदार तथा माजी मंत्री इंजी.राजकुमार बडोले यांनी दिली.
अर्जुनी-मोर तालुक्यातील केशोरी जि.प.क्षेत्रांतर्गत राजोली,भरनोली,व ईळदा हा परिसर आदिवासी अतिदुर्गम व नक्षलप्रभावीत भाग आहे.या परिसरात अनेक समस्या आहेत.त्या समस्या प्राधान्यक्रमाने सोडविण्याचा आपन प्रामाणिक प्रयत्न करणार असून परिसरातील सर्वांगीण विकासासाठी आपले प्रयत्न सुरु आहेत. राजोली, भरनोली,व ईळदा परिसरातील 20ते 25 गावांत सध्या विजेची समस्या गंभीर आहे.याची आपनाला पुर्ण कल्पना आहे.ईळदा येथे 33/11 के.व्ही.चे विद्युत उपकेंद्र अनेक दिवसापासुन प्रस्तावीत आहे.निधी अभावी हे काम थांबल्याची माहीती आहे.या संदर्भात आपण राज्याचे मुख्यमंत्री तथा उर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजीतदादा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेशी स्वत: भेटुन व चर्चा करुन ईळदा येथील प्रस्तावीत विद्युत उपकेंद्र त्वरीत मंजुर करुन निधी उपलब्ध करून देण्यासाठी आपन सांगणार असुन लवकरच हा प्रश्न मार्गी लागेल असा विश्वासही आमदार राजकुमार बडोले यांनी व्यक्त केला आहे.