39.8 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home शैक्षणिक शहिद जान्या-तिम्या जि.प.शाळेचा वीज पुरवठा खंडित

शहिद जान्या-तिम्या जि.प.शाळेचा वीज पुरवठा खंडित

0
67

गोंदिया,दि.३१ : शहीद जान्या तिम्या जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालय व हायस्कूल गोरेगाव जिल्ह्यातील नामाकिंत शाळा म्हणून ओळखली जाते. या शाळेत विविध शासकीय कला, क्रीडा, साहित्य व इतर विषयाशी संबंधित अनेक कार्यक्रम पार पडतात.या शाळेत सुमारे 1100 पेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यांच्या सुविधेसाठी विज, पंखा, आरोच पाणी इत्यादी सोयी सुविधा असल्या तरी सदर विद्युत उपकरण चालवण्यासाठी लागणारा वीज पुरवठा खंडित करण्यात आल्याने जिल्हा परिषद प्रशासन शाळांकडे कशापध्दतीने बघते याचे पितळ उघडे पडले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, शाळेत दोन विद्युत मीटर लागून आहेत. त्यापैकी एक मागील सहा महिन्यापासून बंद आहे. तर दुसरा सोलर सिस्टमसी जुळलेला आहे. नवीन मीटरने वर्ग खोल्यांमध्ये वीज पुरवठा होतो तर जुन्या मीटरने कार्यालयीन कामकाजासाठी मदत होते. हे जुने मीटर बंद होण्यासाठी मुख्याध्यापकांनी वेळोवेळी विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांशी शाब्दिक चर्चा केली पण पत्रव्यवहार केला नाही.

जुना मीटर बंद असला तरी नवीन मीटरशी त्याला जोडून कार्यालयीन कामकाजासाठी उपयोग केले जात होते. ही बाब लक्षात येताच एमएसईबीच्या अधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला व वीज भरणा करण्यास सांगितले. सहा महिन्यापेक्षा अधिकचा काळ लोटला तरी विज बिल भरण्यात न आल्याने नाईलाजाने अखेर (दि. 28 मार्च) रोजी शाळेचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला. ऐन परीक्षेच्या वेळी शाळेतील वीज पुरवठा खंडित होण्यासारखी दुर्दैवी बाब आणखी कोणती असू शकेल. यावरून शाळेच्या व्यवस्थापनाचा अंदाज लावला जाऊ शकतो.