जगत महाविद्यालयात नॅक चमुची पाहणी

0
9

गोरेगाव दि.25: जगत कला, वाणिज्य व इंदिराबेन हरिहरभाई पटेल विज्ञान महाविद्यालयास राष्ट्रीय मूल्यांकण व प्रत्यायन परिषदेच्या त्रिसदस्यीय समितीने भेट दिली. यात अध्यक्ष म्हणून इंदिरा गांधी ट्रायबल विद्यापीठ अमरकंठकचे माजी कुलगुरू प्रा.सी.डी. सिंग, समन्वयक सभासद म्हणून बनारसन हिंदू विद्यापीठ वाराणसी मॅनेजमेंट अभ्यास मंडळाचे विभागप्रमुख प्रा.ए.के. रॉय व सभासद म्हणून शारदा विलास महाविद्यालय म्हैसूरचे माजी प्राचार्य डॉ.ए.एस. अशोककुमार यांचा समावेश होता. त्यांनी १८, १९ व २0 ऑगस्टला महाविद्यालयाचे पुनर्मूल्यांकण केले. याप्रसंगी प्राचार्य डॉ. निलकंठ लंजे यांनी महाविद्यालयाच्या सोयी-सुविधा, महाविद्यालयाची वाटचाल, बांधकाम याबाबत माहिती दिली. समितीने विविध विभागांना भेट देवून व्यवस्थापन समिती सभा, नियमित विद्यार्थी सभा, पालक सभा, माजी विद्यार्थी सभा व मुलींच्या स्वतंत्र कक्षाला भेट देवून पुनर्मूल्यांकण केले. दुसर्‍या दिवशी ग्रंथालय, उरलेल्या विभागांना भेट व व्यवस्थापन विभागातील कार्यालयीन कामांच्या दस्तावेजांची तपासणी केली. तिसर्‍या दिवसी सर्व पदाधिकारी व कर्मचार्‍यांची सामूहिक निरोप सभा घेवून समितीने समाधान व्यक्त केले. पुनर्मूल्यांकणासाठी प्राचार्य डॉ. निलकंठ लंजे, उपप्राचार्य डॉ.एस.एच. भैरम, नॅक समन्वयक डॉ.व्ही.आय. राणे, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी सहकार्य केले.