गोंदिया,दि.३०ः गोंदिया जिल्हास्तरीय अटल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव बोंडगावदेवी येथील शाळेच्या पटागंणावर आयोजित करण्यात आले होते.या स्पर्धेत उच्च प्राथमिक विभागात मुली खो खो मध्ये जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा बिरसोलाने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकविला.
जिल्हा परिषद गोंदिया अंतर्गत दर वर्षी क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते ,सदर प्रसंगी बिरसोला शाळेने केंद्रस्तरीय खो खो मध्ये प्राथमिक व उच्च प्राथमिक गटातील केंद्रातून मुले व मुली विजेता झाले. त्या नंतर तालुक्यात प्राथमिक मुली खो खो व उच्च प्राथमिक मुली खो विजेता होऊन,सलग तीन वर्षांपासून जिल्हास्तरीय कार्यक्रमामध्ये उच्च प्राथमिक गटातील मुलींनी जिल्ह्यात प्रथम क्रमांक प्राप्त केले.तसेच सांस्कृतिक मध्ये सामूहिक नृत्य तिसरा क्रमांक प्राप्त केले.
याचे श्रेय सर्व पालक तसेच शाळेचे मुख्याध्यापक सेवकराम बिसेन,चंदू दुर्गे,डोमेंद्र रहांगडाले,प्रदीप रंगारी, चैताली होटे, नीलकंठ खोब्रागडे, तरंनुम शेख, रितू नागफासे,पंकज नागफासे, विजय नागफासे, अनुज कैलास दंदरे,तसेच बिरसोला सरपंच सरोजिनी ताई दंदरे, उपसरपंच डॉ.देवलाल जमरे, कतेलाल मात्रे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष केशोराव नागफासे, राजेश दंदरे,कुमार बाहे, रविता पाचे, सुरेंद्र पाचे व ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य तसेच गावातील सर्व पालकांना जाते,यांच्या कार्याची स्तुती संपूर्ण गोंदिया पंचायत समिती व जिल्ह्यात होत आहे.





