30.7 C
Gondiā
Saturday, July 25, 2026
Home शैक्षणिक एचएससी परीक्षा कुऱ्हाडी केंद्रप्रमुखाची नियुक्ती रद्द

एचएससी परीक्षा कुऱ्हाडी केंद्रप्रमुखाची नियुक्ती रद्द

0
446

गोंदिया,दि.१९-नागपूर विभागीय शिक्षण मंंडळाच्यावतीने येत्या मार्च २०२६ मध्ये होणाऱ्या एचएससी (बारावी) परीक्षेसाठी रामकृष्ण कनिष्ठ महाविद्यालय, कुऱ्हाडी (ता. गोरेगाव, जि. गोंदिया) येथे परीक्षा केंद्र क्र. ०७३७ निश्चित करण्यात आले होते. या परीक्षा केंद्रावर याच कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकअगस्तीकुमार रणजितसिंह पटले यांची परीक्षा केंद्रप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
मात्र, सामाजिक कार्यकर्ते तसेच भवभूती शिक्षण संस्था, आमगावचे आजीवन सभासद यशवंत सुखरामजी मानकर यांनी विभागीय शिक्षण मंडळ तसेच विभागीय शिक्षण उपसंचालक, नागपूर विभाग, नागपूर यांच्याकडे दाखल केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने पटले यांची नियुक्ती रद्द करण्यात आली आहे.मानकर यांनी दिलेल्या तक्रारीत अगस्तीकुमार रणजितसिंह पटले यांच्याविरुद्ध गंगाझरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल असून ते सध्या अटकपूर्व जामिनावर असल्याचा उल्लेख करण्यात आला होता.या पार्श्वभूमीवर अशा परिस्थितीत असलेल्या व्यक्तीची परीक्षा केंद्रप्रमुख म्हणून नियुक्ती अयोग्य असल्याचे नमूद करून ती रद्द करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती. तक्रारीची दखल घेत विभागीय स्तरावरून कार्यवाही करण्यात आली असून रामकृष्ण कनिष्ठ महाविद्यालय, कुऱ्हाडी येथील एसएससी/एचएससी परीक्षा केंद्रावर अगस्ती पटले यांची परीक्षा केंद्रप्रमुख म्हणून करण्यात आलेली नियुक्ती रद्द केली आहे.

blank