31.2 C
Gondiā
Monday, July 27, 2026
Home शैक्षणिक दामाजी पाटील लांजे माध्यमिक आश्रमशाळा येथे “फाली” या संस्थेमार्फत व्यवसायिक स्पर्धेचे आयोजन

दामाजी पाटील लांजे माध्यमिक आश्रमशाळा येथे “फाली” या संस्थेमार्फत व्यवसायिक स्पर्धेचे आयोजन

0
23

सडक अर्जुनी,दि.११- कृषी क्षेत्रातील सद्यःस्थितीला सक्षम पर्याय देण्यासह या क्षेत्राचे भविष्यातील नायक घडविण्यासाठी ‘फाली’च्या (फ्युचर अॅग्रीकल्चर लीडर्स ऑफ इंडिया) संस्थेमार्फत ग्रामीण भागातील शाळेत 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबविले जातात, अशाच प्रकारे दामाजी पाटील लांजे माध्यमिक आश्रम शाळा येथे विद्यार्थ्यांसाठी कृषी व्यवसाय प्रकल्प नियोजन स्पर्धा आयोजित केली होती, यामधे विद्यार्थ्यांनी त्यांच्या कलागुणांना वाव देऊन वेगवेगळ्या प्रकारचे कृषी व्यवसाय व त्याचे अर्थशास्त्र परीक्षकांसमोर मांडले.यामुळे विद्यार्थ्यांना शाळेमध्ये असतानांच अनेक कृषी व्यवसायांची ओळख होते. भविष्यात याच विद्यार्थ्यांमधून अनेक यशस्वी उद्योजक तयार व्हावेत, हाच या स्पर्धा घेण्याचा फाली या संस्थेचा उद्देश आहे.

या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी कृषी वर आधारीत वेगवेगळ्या प्रकारचे कृषी व्यवसाय तयार करून आणले होते यामधे गुलाब शेती आणि त्यांची उत्पादने , टोमॅटो सॉस, आवळा कँडी, बीट रस , डाळिंबाचा रस बाटलीबंद पॅकमध्ये, मोरिंगा पावडर, तांदळापासून बनवलेले बिस्किटे , दुधापासुन बनवले उत्पादने , मेथी खाकरा, मशरूम अथवा अळंबी उत्पादन, पपईपासून चेरी उत्पादन, नीम पेस्ट गर्द, साबण , तुती लागवड, बटाटे व बटाटे चिप्स या व्यवसाय प्रकल्पाचा समावेश होता. या स्पर्धेला परीक्षक म्हणून शाळेचे प्राचार्य केशव पुस्तोडे,.आर.एस.डोनोडे,राठोड सर, गावल मॅडम, गणवीर यांनी मोलाची भूमिका पार पाडली.कार्यक्रमाचे आयोजन FALI कृषी शिक्षिका कु.श्रद्धा चौहान यांनी केले.

blank