25.1 C
Gondiā
Sunday, July 26, 2026
Home विदर्भ आदर्श तलाठी पुरस्काराने कु.रश्मी पारधी(बिसेन)यांचा वस्त्रोद्योग मंत्री सावकारेंच्या हस्ते सत्कार

आदर्श तलाठी पुरस्काराने कु.रश्मी पारधी(बिसेन)यांचा वस्त्रोद्योग मंत्री सावकारेंच्या हस्ते सत्कार

0
468

गोंदिया दि.०१ : विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखालील विभागीय निवड समितीने नागपूर विभागातील प्रत्येक जिल्ह्यातून उल्लेखनीय कार्यासाठी एका आदर्श तलाठ्याची निवड केली असून 1 मे, महाराष्ट्र व कामगार दिनाच्या जिल्ह्यातील मुख्य शासकीय कार्यक्रमात कु.रश्मी पारधी(बिसेन) यांना आदर्श तलाठी पुरस्काराने वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

महसूल व वन विभागाच्या शासन निर्णयास अनुसरून नागपूर विभागातील सन 2024-25 साठी आदर्श तलाठी पुरस्काराकरिता विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखालील  विभागीय निवड समितीने गोंदिया जिल्ह्यातून अदासी येथील ग्राम महसुल अधिकारी(तलाठी)साझा.क्रं.३३ च्या कु.रश्मी रोशनलाल पारधी यांची निवड करण्यात आली.आदर्श तलाठी पुरस्कारासाठी निवड झालेल्या नागपूर विभागातील या समर्पित आणि कर्तव्यदक्ष तलाठ्यांचे त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल जिल्हाधिकारी,निवासी उपजिल्हाधिकारी,उपविभागीय अधिकारी व तहसिलदारा गोंंदिया यांनी अभिनंदन केले.

blank