‘एक आमदार एक शाळा’-शिक्षणमंत्री तावडे

0
11

नागपूर : राज्यात मरणपंथाला लागलेल्या मराठी शाळांना ऑक्सिजन पुरवण्यासाठी सरकारने नामी योजना शोधून काढली आहे. ‘एक आमदार एक शाळा’ योजनेद्वारे मराठी शाळांना नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न सरकार करणार आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधानसभेत ही माहिती दिली.

कॉन्व्हेंट आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे मराठी शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. विधानसभेत यावर चर्चा सुरु असताना विरोधकांनी मराठी शाळा वाचवण्याची मागणी केली. त्यावर उत्तर देताना मराठी शाळांसाठी सरकार पुढाकार घेत ठोस उपाययोजना करेल, असं आश्वासन विनोद तावडे यांनी दिलं आहे.

यासाठी प्रत्येक आमदाराने आपल्या मतदारसंघातील एक मराठी शाळा दत्तक घेण्याची योजना ताडवेंनी मांडली. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खासदार गाव दत्तक योजना प्रत्यक्षात उतरवल्यानंतर त्याच योजनेतून प्रेरणा घेऊन ही नवी योजना तावडेंनी समोर आणली आहे.