कोंबडी वाटप योजनेला विरोध म्हणून अंडे फेक आंदोलन !

0
12

अकोला : अकोला जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्या विशेष सभेत आज सदस्यांनी चांगलाच गोंधळ घातला. विशेष म्हणजे सभेत थेट अंडे फेक करत सदस्यांनी समाज कल्याण विभागाच्या कोंबडी वाटप योजनेला विरोध दर्शवला.

समाज कल्याण विभागाच्या वतीनं मागासवर्गीयांसाठी कोंबडी वाटप तसंच अंडे उबवण्याच्या मशिन्स वाटपाची मोहिम राबवली जाते. मागासवर्गीय सुशिक्षीत बेरोजगारांना रोजगार मिळावा. अंडे विक्रीचा व्यवसाय करता यावा हा या योजनेमागचा हेतू.

पण, या योजनेची उपयुक्तता आणि योजनेसाठी लाभार्थ्यांची निवड अशा विविध पद्धतींना विरोधकांनी विरोध दर्शवला. शेवटी हा विरोध थेट बैठकीतच अंडे फेकण्यापर्यंत पोहोचला आणि बैठकीत चांगलाच गोंधळ माजला.

त्यामुळं विरोधकांनी कोंबडी वाटप योजनेचा विरोध म्हणून ज्या अंड्यातून कोंबडी जन्म घेते ते अंडेच फेकून मारण्यास सुरुवात केली. त्यामुळं या योजनेच्या बैठकीचा पुरता भज्जा उडाल्याचं चित्र तयार झालं.

योजना आणि त्याला विरोध हे तसं आपल्या देशात नेहमीचच सूत्र.. त्यामुळंच अनेक योजना गुंडाळण्याची सवयही आपल्याला तशी जुनीच.. चळवळी आणि आंदोलनाची भूमी असलेला महाराष्ट्र तर या सगळ्यात एक पाऊल पुढे.. त्यामुळं योजनेनुसार अशी साजेशी आणि प्रतिकात्मक आंदोलनं ही महाराष्ट्रात होतच राहणार..