26.9 C
Gondiā
Saturday, July 25, 2026
Home शैक्षणिक रत्नदीप विद्यालयातील तीन विद्यार्थ्यांची ‘नीलकमल स्मृती गुणवत्ता’ पुरस्कारासाठी निवड

रत्नदीप विद्यालयातील तीन विद्यार्थ्यांची ‘नीलकमल स्मृती गुणवत्ता’ पुरस्कारासाठी निवड

0
30

सडक अर्जुनी-रत्नदीप विद्यालय चिखली येथील तीन विद्यार्थ्यांची ‘नीलकमल स्मृती गुणवत्ता’ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. मार्च 2026 मध्ये झालेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत विद्यालयातून प्रावीण्यसह प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या तीन विद्यार्थ्यांची सदर पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. यामध्ये प्रथम क्रमांक कु.श्रावणी विश्वपाल वैद्य ( 82.60 टक्के) द्वितीय कु.मोहिनी मुकुंदा बोरकर (76 टक्के ) व तृतीय टींकेश सखाराम बहेकार (73.40 टक्के) या तीन विद्यार्थ्यांचा समावेश आहे. विद्यालयात पुढील होणार्‍या कार्यक्रमामध्ये सेवानिवृत्त शिक्षक तथा नीलकमल स्मृती फाऊंडेशनचे आयोजक आर. व्ही. मेश्राम यांच्या तर्फे विद्यार्थ्यांना पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात येणार आहे. पुरस्कारासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे नीलकमल स्मृती फाऊंडेशनचे आयोजक आर. व्ही.मेश्राम ,आयोजिका
प्रज्ञा मेश्राम ,मुख्याध्यापक एल.एम. पातोडे शिक्षक व कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे. उल्लेखनीय म्हणजे, सेवानिवृत्त शिक्षक आर. व्ही. मेश्राम यांच्या मुलाच्या स्मृती प्रीत्यर्थ नीलकमल स्मृती गुणवत्ता पुरस्कार 2004 पासून देण्यात येत आहे.