भंडारा,दि.05 : शिक्षणातून कुटूंबाच्या उदरनिर्वाहाला हातभार लागू शकते. त्याकरिता शिक्षणात बदल होणे गरजेचे आहे. त्यासाठी व्यवसायिक शिक्षणाची गरज आहे असे खा. नाना पटोले यांनी राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचेशी चर्चा करतांना सांगितले. व्यावसायिक शिक्षणाची गरज असून शिक्षणात बदल होणे गरजेचे आहे. व्यावसायिक शिक्षणातून कुटूंबाच्या उदरनिर्वाहाला हातभार लागू शकेल. अशा पध्दतीचे शिक्षण देणे गरजेचे असून त्याकरिता शिक्षणात बदल करुन व्यावसायिक शिक्षणाची गरज असल्याचे खा.पटोले यांनी शिक्षणमंत्र्यांशी चर्चा करतांना सांगितले. जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये डिजीटलायझेशन प्रणाली अवलंविण्यात आली. याचा फायदा विशेषत: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना होणार आहे. स्पर्धा परिक्षांमध्ये ग्रामीण विद्यार्थी टिकला पाहिजे त्यासाठी दर्जेदार शिक्षण मिळायला पाहिजे. यासाठी जिल्ह्यातील संपूर्ण शाळा डिजीटल करण्याचा आपला मानस असून सर्वांच्या पुढाकारातून शाळा डिजीटल करण्याचा आपला मानस असून सर्वांच्या पुढाकारातून शाळा डिजीटल कशी होईल यासाठी सर्वांच्या सहकार्यानेच होऊ शकते. येत्या काही वर्षात जिल्ह्यातील सर्व शाळा डिजीटल होणार असून यासाठी उच्च स्तरावरुन प्रयत्न चालविले जात असल्याचे खा.नाना पटोले यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना सांगितले.





