24.5 C
Gondiā
Friday, August 21, 2026
Home विदर्भ आमसभेची नोंद न घेतल्यास कारवाई

आमसभेची नोंद न घेतल्यास कारवाई

0
23

तुमसर दि. 5 : पंचायत समितीच्या आमसभेत लोकप्रतिनिधींच्या प्रश्नांची नोंद घेतली जात नाही. केवळ वेळ मारुन नेणे यापुढे खपवून घेतले जाणार नाही. आमसभेतील चर्चेची नोंद न घेतलेल्या विभागप्रमुखांवर कारवाई केली जाईल, असा इशारा आ.चरण वाघमारे यांनी तुमसर पंचायत समितीच्या आमसभेत दिला.

सभेच्या अध्यक्षस्थानी आ. चरण वाघमारे होते. आमसभेला उपमुख्य कार्यपालन अधिकारी सुधाकर आडे. उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले, तहसीलदार गजेंद्र बालपांडे, नायब तहसीलदार हरिशचंद्र मडावी, सभापती कविता बनकर, उपसभापती शेखर कोतपल्लीवार, गटनेता हिरालाल नागपुरे, जि.प सदस्य संदीप टाले, धनेंद्र तुरकर, नगरसेवक सुनिल पारधी, रजनीश लांजेवार, मेहताब सिंग ठाकुर, खंडविकास अधिकारी विजय झिंगरे उपस्थित होते.

तुमसर तालुक्यातील अनेक गावात वीज समस्या, शिक्षण, आरोगय, सार्वजनिक बांधकाम, ग्रामीण पाणीपुरवठा, रोजगार हमी योजनेसह इतर विभागाच्या तक्रारीचा पाठा ९७ ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच तथा पदाधिकाऱ्यांनी वाचला. संबंधित विभागाचे काही अधिकारी समाधानकारक उत्तरे देऊ शकले नाही. मागील आमसभेतील प्रश्न अद्याप सुटले नाही. त्यांचा पाठपुरावा केला नाही, त्यावर आ. वाघमारे यांनी नापसंती व्यक्त करुन आमसभेतील चर्चेची नोंद न घेतल्यास कारवाई करण्याचा इशारा अधिकाऱ्यांना दिला. आमसभेला पंचायत समिती सदस्य शिशुपाल गौपाले, राधेश्याम गाढवे, गुरुदेव भोंडे, विमल नाकतोडे, मंगला कनपटे, अशोक बन्सोड, रेखा धुर्वे, मालिनी वहीले, जितेंद्र सरीयाम, डॉ. हरेंद्र रहांगडाले, सरपंच गजानन लांजेवार, मदन भगत, वंसत बिटलाये, टी. डी. शरणागत, रिता मसरके, विरेंद्र दमाहे, रिना मासुलकर, गिरी यांच्यासह ग्रामपंचायतचे पदाधिकारी उपस्थित होते.