शिक्षक बिंदुनामावलीत चुका

0
11
चिमूर,दि.29-जिल्हा परिषद श्क्षिण विभागांतर्गत येत असलेल्या चिमूर पंचायत समिती विभागाच्या कार्यालयात शिक्षकांची बिंदुनामावली यादी आहे. शिक्षकांनी बिंदुनामावली यादी घालून बघितली असता त्या बिंदुनामावलीत भरपूर चुका आढळून आल्यात. जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून अशाप्रकारच्या चुका होणे म्हणजे विनाकारण शिक्षकांना त्रास देण्याचा प्रकार असल्याचा आरोप महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक समिती तालुका शाखा चिमूरनी केला आहे.

कार्यालयात शिक्षकांचे सेवापुस्तक अद्यावत आहे. सेवापुस्तकाच्या आधारे शिक्षकांची बिंदुनामावली तयार करायला पाहिेजे होते. मात्र जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून तरी होताना दिसत नाही. जिल्हा परिषद शिक्षणाच्या लिपिकामुये हा सारा प्रकार घडलेला आहे. याकडे वरिष्ठ अधिकर्‍यांचे लक्ष नाही. अश चुका करणार्‍या संबंधित लिपिकांवर वरिष्ठ अधिकारी कोणत्याही प्रकारची कार्यवाही करीत नसल्यामुळे चुकीची माहिती सादर करून वरिष्ठ अधिकार्‍यांची दिशाभुल करीत असतात. या चुकामध्ये संबंधित लिपिकांचा काहीतरी हेतु दडलेला असतो. मात्र शिक्षकांनी थोडीशी जरी चूक झाली तरी जिल्हा परिषद संबंधित शिक्षकास निलंबित सारखी कार्यवाही करून त्यांना वेठीस धरतात. मात्र एवढय़ा भयंकर चुका करणार्‍यावर जिल्हा परिषद प्रशसनाकडून कार्यवाही होत नाही. ही खेदाची बाब आहे.
यादीतील चुका याप्रमाणे निवड प्रवर्ग जर ओपन असेल तर जात गोंड/कुणबी असेल तर जातीचा प्रवर्ग हा ओपनच दर्शविलेला आहे. शिक्षकांची जात कुठल्या संवर्गामध्ये समाविष्ठ येते याचीही माहिती नसणे ही शोकांतिका आहे. तसेच नियुक्ती दिनांक, जन्मदिनांक, एखाद्याची जातच बदलवून ठेवणे असे अनेक प्रकार आहे. शिक्षक विभागाच्या अनागोंदी कारभारामुळे शिक्षकांना मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे.
संबंधित शिक्षकांनी केलेल्या अर्जाप्रमाणे मूळ सेवापुस्तक तपासून नव्याने शिक्षक बिंदुनामावली प्रत्येक गटशिक्षणाधिकार्‍याने अद्यावत करून घ्यावे व चुका करण्याचे टाळावे. शिक्षकांच्या संबंधित प्रकरणास जे दोषी असेल त्यांचेवर वरिष्ठ अधिकार्‍यांनी योग्य ती प्रशसकीय कार्यवाही करावी, अशी मागणी महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती तालुका शाखा चिमूरन केलेली आहे.