आवश्यक असलेल्या गोष्टींवर संशोधन व्हावे-प्राचार्य डाॅ.सी.बी.मसराम

0
15

गोंदिया- ‘मानवीजीवन सुकर होण्यासाठी संशोधनाची गरज आहे. समाजाला आवश्यक असलेल्या गोष्टींवर संशोधन व्हावे. अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्यावर कल्पकतेने विचार करून संशोधन करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळावी, यासाठी ‘आविष्कार’ स्पर्धा महत्त्वाचे व्यासपीठ आहे. अधिकाधिक विद्यार्थ्यांनी संशोधनासाठी पुढे यावे,’ असे आवाहन एस.एन.मोर महाविद्यालय तुमसरचे प्राचार्य डाॅ.सी.बी.मसराम यांनी केले. आविष्कार स्पर्धेच्या उद्घाटनपर भाषणात ते बोलत होते.
या प्रसंगी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी धोटे बंधु महाविद्यालयाचे प्राचाय़ डाॅ.अंजन नायडू होते.मंचावर डॉ. एच.आर.त्रिवेदी,डाॅ.एस.आर.चोपणे,डाॅ.दिलीप चौधरी उपस्थित होते.या महोत्सवामध्ये गोंदिया भंडारा जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांचा सहभाग होता.100 विद्याथ्यार्ंनी माॅडेल,शोधात्मक तक्ते प्रदशीर्त केले.सहा विद्याशाखेतील प्र्रत्येकी दोन उत्कृष्ठ प्रदशर्न करणायाची निवड करण्यासाठी 18 परिक्षक नियुक्त करण्यात आले.आयोजनासाठी प्राचार्य डाॅ.नायडू यांच्या मागर्दशर्नात सयोंजक प्रा.चोपणे,सहसयोंजक प्रा.चौधरी,एस.के.पालीवाल,वाय.एस.बोपचे.आंदन मोरे,कु.नागपुरे,शितल बॅनजीर्,कोमल पिल्ले,महाखोडे,आशिष शहारे,प्रा.नालमवार,प्रा.सोनी,प्रा.भोयर यांनी सहकायर् केले.