आदिवासी विद्यार्थी संघटनेने आश्रमशाळेला कुलूप ठोकले

0
18

तुमसर,दि. 8 : तालुक्यातील बापूची अनुदानित आश्रमशाळा, आंबागड येथील मुलाच्या मृत्युप्रकरणी अद्याप कुणालाच अटक न करण्यात आल्याने शासन व प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्याकरिता आदिवासी विद्यार्थी संघाने आंबागड येथे गुरूवारी आश्रमशाळेला कुलूप ठोको आंदोलन केले. आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
३० जुलै रोजी बापूजी आदिवासी आश्रमशाळेतील महेंद्र सलामे या विद्यार्थ्यांचा वीज तारांना स्पर्श होऊन घटनास्थळी मृत्यु झाला होता. याकरिता आदिवासी संघटनेने आंदोलन केले होते. शाळेचे संचालक सचिन राजू सेलोकर, अध्यक्ष हेमराज कापगते, उपाध्यक्ष अनंतलाल दमाहे व अधिखक अनिल बोरकर यांच्यावर भांदवी ३०४ (अ) ३४ अन्वये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. संबंधितांना अटक करण्याची मागणी आदिवासी संघटनेच्या पदाधिकाºयांनी केली आहे.
आदिवासी प्रकल्प अधिकाºयांचे येथे नियंत्रण आहे. त्यांनी कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी निलंबित करून उच्चस्तरीय चौकशीची मागणीही संघटनेने केली आहे. स्व. इंदिराबाई मरस्कोल्हे अनुदानित पवनारखानी आश्रमशाळेत आतापावेतो सात विद्यार्थ्यांचा मृत्यू विविध कारणाने झाला.
या दोन्ही शाळांची मान्यता रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. २ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाच्या सदस्य मायाताई ईनवाते आल्या होत्या. त्यांनी दोन्ही आश्रमशाळांची पाहणी व चौकशी केली. कारवाईचे आश्वासन त्यांनी दिले होते. गुरूवारी आंबागड येथे आदिवासी संघटनेचे पदाधिकारी अशोक उईके, लक्ष्मीकांत सलामे, जि.प. सदस्य उत्तम कळपते, अनिल टेकाम, लक्ष्मीकांत सलामे, राजू वाडवे, दुर्गाप्रसाद परतेती, लिखराम मरस्कोल्हे यांना पोलिसांनी अटक केली.