देवरी येथे कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन
देवरी- समाजातील भोंदू बाबा-बुवांच्या नादाला लागल्याने अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. अंधश्रद्धा म्हणजे समाजाच्या अधोगतीचा राजमार्ग होय. आपले जीवन सुखकर करण्यासाठी प्रत्येकाने अशा अंधश्रद्धा पसरविणाऱ्यांपासून सावध झाले पाहिजे. प्रसंगी समाजात अज्ञान पसरविणाऱ्यांविरोधात कायद्याचा आधार घेतला पाहिजे, असे प्रतिपादन अॅड.डॉ. श्रावण उके यांनी देवरी येथे केले.
ते तालुका विधिसेवा समिती तथा दिवाणी न्यायालय व देवरी तालुका वकील संघाच्या संयुक्त विद्यमाने दिवाणी न्यायालयात आयोजित कायदेविषयक मार्गदर्शन शिबिरात बोलत होते. शिबिराचे अध्यक्षस्थानी देवरीच्या दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश न्या. ठोंबरे होते. यावेळी तालुका तालुका बार असोशिएसनचे अध्यक्ष अॅड. प्रशांत संगीडवार, सरकारी अभियोक्ता सरोज जैन, अॅड. दीपक कोसरकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित नागरिकांना मान्यवर वक्त्यांनी मार्गदर्शन केले.
शिबिराचे संचालन अॅड. मुकेश शहारे यांनी केले. उपस्थितांचे आभार अॅड. भाजीपाले यांनी केले. शिबिराचे यशस्वितेसाठी सर्व न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.