शिक्षक समितीने नोंदविला असर संस्थेचा निषेध

0
9

गोंदिया- राज्यातील जिल्हा परिषद शाळामधील शिक्षणाची माहीती सवेर्क्षणातून गोळा करुन तो अहवाल प्रकाशित करणार्या संस्थेचा निषेध नोंदविण्यासाठी आज शनिवारी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी अनंत वालस्कर यांच्यामाफेर्त शासनाला निवेदन सादर करण्यात आले. प्राथमिक शिक्षकांचे व जि. प. शाळांचे बदनामी करणारे सर्वेक्षण महाराष्ट्रात सादर करण्याचा प्रथम व असर या स्वयंसेवी संस्थांच्या अहवालाचा निषेध करणारे निवेदन मुख्यमंत्री यांना जिल्हाधिकारी गोंदिया यांचे मार्फत पाठविण्यात आले.या संस्थानी जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्याथ्यार्ंचा शिक्षणात मोठ्याप्रमाणात अडथळे असून अद्यापही चांगले शिक्षण मिळत नसल्याचेच नव्हे तर विद्याथ्यार्ंना लेखन वाचन सुध्दा येत नसल्याची आकडेवारी समोर मांडली आहे.ही आकडेवारी खोटी असून शिक्षकांना बदनाम करण्यासाठी संस्था विदेशी निधीतून काम करीत असल्याचा आरोप प्राथमिक शिक्षक समितीने केला असून खासगी शाळाची माहीती संस्था का सादर करीत नाही असाही उल्लेक केला आहे. निवेदन देतेवेळी महाराष्ट्र राज्य शिक्षक समिती जिल्हा गोंदियाचे जिल्हाध्यक्ष मनोज दिक्षित सरचिटणीस एल. यू. खोब्रागडे उपाध्यक्ष किशोर डोंगरवार,सुरेश रहागंडाले, व शिक्षक समिती व पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी तिरोड्याचे आमदार विजय रहागंडाले,गोंदियाचे तहसिलदार संजय पवार आणि उपजिल्हाधिकारी लोणकर उपस्थित होते.