आ.गाणारांच्या उपस्थितीत शिक्षकांची सहविचार सभा

0
14

गोंदिया,दि.25 : शिक्षक आमदार नागो गाणार यांच्या अध्यक्षतेत जि.प. गोंदिया येथे शिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनात बुधवार (दि.२२) शिक्षक परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची सहविचार सभा पार पडली. या वेळी शिक्षणाधिकारी (माध्य व प्राथ) उपस्थित होते. चर्चेवेळी नागपूर विभागाचे उपाध्यक्ष राधेश्याम पंचबुध्दे, अध्यक्ष के.के. बाजपेई, जिल्हा अध्यक्ष ओमप्रकाश पवार, कार्यवाह गुणेश्वर फुंडे, कोषाध्यक्ष छत्रपाल बिसेन, पाडुरंग गहूकर, प्रसिध्दी प्रमुख मुरलीधर करंडे, रतिराम डोये, तसेच इतर पदाधिकारी, तालुकाध्यक्ष व कार्यवाह, लिपिक चौधरी व वेतन पथक प्रभारी रहांगडाले उपस्थित होते.
शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांच्यासोबत सकाळी ११ वाजता सभा सुरु करण्यात आली. यात सहविचार जिल्हा परिषदमधील माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील शिक्षक, पर्यवेक्षक व मुख्याध्यापकांची रिक्त पदे अविलंब भरण्यात यावी, सद्यस्थितीत जि.प. मधील मुख्याध्यापकांची रिक्त पदांची स्थिती उघड करुन मुख्याध्यापक पदोन्नतीचे कार्यवृत्त, पत्र, टिप्पनी पत्र व बिंदु नामावली प्रत उपलब्ध करुन देण्यात यावे, बिंदुनामावलीनुसार अन्याय झालेल्या पात्र शिक्षकांना संधी देण्यात यावी. माध्यमिक विभागातील पात्र शिक्षकांना कनिष्ठ महाविद्यालयात तसेच एल.डी. शिक्षकांना माध्यमिक विभागात विकल्पानुसार अविलंब पदोन्नती देण्यात यावी.
पदविधर वेतनश्रेणी देऊन सेवाज्येष्ठतेचा लाभ पदोन्नतीसाठी देण्यात यावा. बीएड, बीपीएड अर्हता धारक शिक्षकांना पदविधर वेतनश्रेणीचा लाभ देवून सेवा जेष्ठतेचा लाभ पदोन्नतीसाठी देण्यात यावा. नक्षलग्रस्त भागातील कर्मचाºयांना अतिरीक्त घरभाडे देण्यात यावे. बदली पोर्टलमध्ये माध्यमिक शिक्षकांचा समावेश करण्यात यावा, या विषयावर चर्चा करण्यात आली.
यानंतर प्रभारी शिक्षणाधिकारी सुनील मांढरे यांच्यासोबत सहविचार सभा पार पडली. यात किमान दोन महिन्यांतून एकदा सहविचार सभा घेण्यात यावी. कार्यालयीन अधीक्षक यांच्याकडे प्रलंबित प्रकरणांचा नियमित आढावा घेण्याबाबत जबाबदारी सोपवण्यात यावी. कार्यालयातील लिपिक वारंवार त्रृट्या काढतात त्या एकदाच काढण्याची सूचना देण्यात यावी. वेतन दरमहा कोणत्याही परिस्थितीत तारखेला मिळावे. भविष्य निर्वाह निधीतील अग्रीम नियमानुसार प्रकरणे त्वरीत निकाली काढावे. सेवानिवृत्तीपूर्वी आठ महिने अगोदर सेवानिवृत्ती वेतन प्रकरणे सादर करण्याबाबत मुख्याध्यापकांना निर्देश देण्यात यावे.
अतिरिक्त शिक्षकास मुख्याध्यापक यांनी रुजू न केल्यास पूर्ण शाळेचे वेतन न थांबविता फक्त संबंधित मुख्याध्यापकाचे वेतन थांबविण्यात यावे. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांना दरमहा मासिक वेतनाचे विवरण देण्यात यावे. विनाअनुदानित सेवा वरिष्ठ व निवड श्रेणीसाठी ग्राह्य धरण्यात यावी.
तसेच जिल्ह्यातील २६ शाळांची संच मान्यता अजूनही अप्राप्त आहे. भविष्य निर्वाह निधीची २०१५-१६ व २०१६-२०१७ ची लेखा विवरण पत्रे प्राप्त झालेली नाही, ती त्वरित देण्यात यावी. वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीची देयके त्वरित निकाली काढण्यात यावी. जिल्ह्यातील काही शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांच्या तक्रारीवर सुध्दा चर्चा करण्यात आली.
शिक्षक आ.ना.गो.गाणार यांनी दोन्ही शिक्षणाधिकाºयांना सदर विषयांचे निराकरण त्वरित करण्याचे निर्देश दिले.