26.4 C
Gondiā
Tuesday, August 25, 2026
Home शैक्षणिक घुर्मरा शाळेच्या नराधम मुख्याध्यापकाल अटक

घुर्मरा शाळेच्या नराधम मुख्याध्यापकाल अटक

0
25

गोंदिया,दि.22 –  गोरेगाव तालुक्यातील घुर्मरा  जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक जयेश शहारे यांनी गुरु -शिष्याच्या नात्याला काळिमा फासणारे कृत्य केल्याने पोलीसांनी या नराधम मुख्याध्यापकाल अटक केली अाहे. पालकांनी मात्र जोपर्यंत सदर मुख्याध्यापकाला सेवेतून बडतर्फे करत नाही,तोपर्यंत मुलांना शाळेत न पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.गेल्या काही दिवसापासून मुख्याध्यापक शहारे हे शाळेतील मुलींना विविध कारणाने आपल्या कक्षात बोलावून त्यांना मोबाईलवर अश्लील चित्रफित दाखवून त्यांचे लैंगीक शोषण करण्यासाठी प्रलोभन देत छळ करीत असल्याची तक्रार विद्यार्थींनीनी आपल्या पालकांना केली.त्या तक्रारीच्या आधारे गुरुवारला दुपारनंतर पालकांनी शाळेकडे आपला मोर्चा वळविला.त्यानंतर सदर मुख्याध्यापकाला विचारपूस केल्यानंतरही काही बोलत नसल्याने मुख्याध्यापकाला शाळेच्या खोलीतच डांबले आणि सदर प्रकरणाची माहीती गोरेगाव पोलीसांना दिली.पोलीसांनीही घटनास्थळ गाठून सदर मुख्याध्यापकाला ताब्यात घेत बाललैंगिक अत्याचार कायद्यातंर्गत अटक करुन गुन्हा दाखल केला आहे.