सचिनच्या अनुभवकथनाने गोंदियाकर भारावले!

0
12

गोंदियाच्या मनोहरभाई पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परिसरात आयोजित सुवर्णपदक वितरण समारंभात अनुभव कथन करतांना भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि त्यांची मुलाखत घेताना विक्रम साठे.

गोंदिया- कोणतेही ध्येय हे कठीण नाही, फक्त गरज आहे ती स्विकारण्याची. संकट प्रत्येकाच्या जीवनात येतात-जातात. त्यामुळे qजकण्याची तयारी मनात ठेवा, यश तुमचेच आहे, असा मोलाचा संदेश भारतरत्न खासदार सचिन तेंडुलकर यांनी देताच युवकांनीही त्याच जोशात स्वागत केले. स्व.मनोहरभाई पटेल स्मृती स्वर्णपदक वितरण समारभांला उदघाटक म्हणून आज गोंदियात आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यानंतर त्यांनी भाषण देण्याऐवजी आपले अनुभवकथन मुलाखत स्वरुपाने गोंदियाकरांना ऐकविले. ते स्व.मनोहरभाई पटेल यांच्या १०९ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात विद्र्याथ्र्यांना सुवर्णपदक वितरण करण्यासाठी आले होते.
सचिन तेंडुलकर यांची गोंदियाला येण्याची ही पहिलीच वेळ. आपण विदर्भाच्या मातीत आलो आहे, खेळलो आहे. परंतु, गोंदियाला प्रथमच येत असल्याचे सांगत आपण आपल्या आयुष्यात कॉलेज लाईफ कधी अनुभवलेले नव्हते. फक्त चित्रपटातून बघितले होते. परंतु, आज गोंदिया शिक्षण संस्थेच्या मनोहरभाई पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परिसर आणि विद्याथ्र्यांशी संवाद साधल्यावर आयुष्यात आपण महाविद्यालयीन लाईफ मिस केल्याची जाणीव झालीष अशी प्रांजळ कबुली देत मनाला शांती व आनंद मिळाल्याचे उदगारही त्याने काढले.
आपल्या अनुभव कथनाने गोंदियाकरांना भारावूून सोडणाèया सचिनने शेवटी मात्र वर्षातील एक तास तर स्वच्छतेसाठी देण्याचे आवाहन करीत स्वच्छ भारताची आवश्यकता असल्याचे सांगितले. स्वच्छ भारताशिवाय स्वस्थ भारत होऊच शकत नाही, असेही सचिन सांगत असतानाच आपला देश डायबिटिजमध्ये अव्वलस्थानी आहे. हा डायबिटीजचा रोग आटोक्यात आणण्यासाठीच खरे आरोग्याप्रती मुलामध्येच नव्हे तर मोठ्यांमध्ये जनजागृती करुन स्वस्थ भारत स्वच्छ भारत निर्माण करण्यासाठी युवकांनी १ तास स्वच्छतेला द्यावे, असा आग्रह केला.
मुंबईहून आलेले कलावंत विक्रम साठे यांनी घेतलेल्या मुलाखतीतून सचिनच्या आयुष्यातील घडामोडींची व अनुभवांची माहिती महाविद्यालयीन विद्याथ्र्यांना जशजशी मिळत होती, तस तसे विद्याथ्र्यांमध्ये सुध्दा सचिन सचिन च्या घोषणांची स्पर्धा दिसून येत होती. मुंबईच्या गल्लीतून टेनीसबॉलने क्रिकेटची सुरवात करणाèया सचिनने आपल्या संपूर्ण जीवनातील अनुभव उपस्थितांसमोर व्यक्त केले. दरम्यान, वयाच्या ११ व्या वर्षी आपल्या खट्याळ व खोडकर प्रवृत्तीमुळे घरचे कुटुबियं चांगलेच त्रासले होते. बाहेरच्यांच्या तक्रारीत सातत्याने वाढ आणि कॉलनीतील लोकांच्या घरांच्या माझ्या चेंडूने फुटणारे खिडक्यांचे काच आजही आठवतात. आपल्या बालपणात दुरदर्शनशिवाय दुसरे चॅनेल नसल्याने एकदिवस सायकांळच्या सुमारास देवानंदची गाईड हे चित्रपट बघत असतानाच आपल्या व मित्रांच्या डोक्यात खोळकर विचार आला आणि चाळीशेजारीलच एका आंब्याच्या झाडावर चढून आंबे तोडायला सुरवात केली. एकाच फांदीवर आम्ही दोघेही मित्र आंबे तोडत असतानाच आम्ही पकडले गेलो. अशा अनेक तक्रारीमुळे कुटुqबयाना राग आला आणि भावाने मला क्रिकेटच्या ग्राऊंडवरच पाठविण्याचा निर्णय घेत सरळ मुंबईतील सर्वात मोठ्या आणि खेळाडू घडविणाèया शिवाजी मैदानावर नेऊन आचरेकर सरांच्या हवाली केले. आणि तिथूनच माझ्या खèया कॅरीयरला सुरवात झाल्याचे सांगतानाच सचिन म्हणाला की, आपण एप्रिलच्या कडक उन्हात प्रशिक्षणाला सुरवात झाली. शिवाजी मैदान ते घरापर्यतचा दिवसातून दोन तीनदाचा प्रवासही तसा त्रासदायकच असायचा. बसमध्ये चढला की कंडक्टर वाकड्या नजरेने बघत ओरडायचा. तर घामामुळे कपड्यांची वास येत असल्याने बसमधील प्रवासी सुध्दा आदीच दूर व्हायचे. अशा अनेक अनुभवांचा सामना करीत सकारात्मक विचार ठेवत समोर जात गेलो. त्यामुळेच मी आज इथपर्यंत पोचल्याचे सचिनने सांगितले. शालेय क्रिकेटपासून तर रणजी क्रिकेटमधून विश्व क्रिकेटमधील प्रवेशापर्यंतच्या थरारक प्रवासाचे वर्णन करताना सचिनने सांगितले की, सुरवातीला विश्वस्तरावर प्रसिध्द असणाèया खेळाडूंसोबत अत्यल्प वयात क्रिकेट खेळताना खूप दडपण असायचे. अनेकदा क्रिकेटच्या मैदानात अपयश आल्याने मी अक्षरशः ड्रेसींगरुमध्ये रडत बसायचो. अनेकदा ड्रेसींगरुममधील आरशाकडे बघून स्वतःचे अस्तीत्तव वाढविण्याची शक्ती निर्माण केली. त्यातच रवी शास्त्री यांनी आपण शालेय क्रिकेट नव्हे तर विश्वपातळीवरील खेळाडूसोबत खेळत आहोत याचा विचार करण्याचा दिलेला सल्ला मला महत्वाचा मार्गदर्शन करणारा ठरल्याचेही त्याने आवर्जून सांगितले. अप़शातून सावरतच क्रिकेट जगात यश मिळाले. त्यामुळे विद्याथ्र्यानीही अपयशाने खचूून न जाता जिद्द मनात ठेवा. नक्कीच यशस्वी व्हाल, असा मौलिक सल्ला दिला. आपल्याकडे आहे, त्याचा सन्मान करायला शिका. प्रत्येकाचे स्वतःचे एक अस्तीत्व असते. हे जाणायला पाहिजे. भारत पाकिस्तान क्रिकेट सामनादरम्यान मनावर प्रचंड राहत असल्याचेही सचिनने कबुल केले.
क्रिकेटच्या सुरवातीलाच वकार युनूसच्या बॉलवर जखमी झाल्यावर क्रिकेटमधून बाहेर जाण्याचे सल्ले येत होते. मात्र,मी जिद्द सोडली नाही. प्रत्येक सामना qजकण्यासाठीच मैदानात उतरलो, असेही सचिन म्हणाला. दरम्यान, बालपणी मित्रांसोबत केलेली आंबे चोरण्याची प्लqनग आणि त्यात झालेली फसगत, सचिनने आवुर्जन सांगितली. सचिनच्या नावाचा गजर करत युवकांनी एकच जल्लोष केला. सचिनची अर्धांगिणी अंजलीसोबतचे प्रेमसंबंधही कसे दृढ होत गेले. अंजलीसोबत १९९५ ला रोजा चित्रपट बघायला गेल्यानंतर डोक्यावरुन पडलेली विग आणि तुटलेलया चष्मामुळे लोकांनी ओळखल्याने उडालेला गोंधळ आदीचा उल्लेख करीत आपल्या लग्नाची बोलणी अंजलीनेच आपल्या आईवडीलांसोबत केल्याचे सांगत आपण त्यावेळी न्युझीलंडमध्ये होतो, असेही सांगितले. २०११ मधील विश्वकप हा क्रिकेटचा नव्हे, तर संपुर्ण देशाचा होता असे म्हणून देशभक्तीचा परिचय देत राहुल द्रविड, वीरेंद्र सहवाग यांच्यासोबतचे किस्स्यांनाही त्याने उजाळा दिला. एकदंरित सचिनच्या बालपणापासून तर क्रिकेटपर्यंतच्या आणि त्यानंतरच्या प्रवासाचा अनुभव करताच गोंदियाकर भारावून गेले.