आमगाव : भवभूती शिक्षण संस्थेच्या लक्ष्मणराव मानकर तंत्रनिकेतन विद्यालयाच्या नवनिर्मीत इमारतीचे लोकार्पण खासदार नाना पटोले यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी खासदार अशोक नेते होते. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार संजय पुराम, भवभूती शिक्षण संस्थेचे सचिव केशव मानकर, अध्यक्ष सुरेश असाटी, उपाध्यक्ष प्रमोद कटकवार, हरिहर मानकर, ढे.र. कटरे, स.र. अंजनकर, उर्मीला कावळे, लक्ष्मी नागपुरे, डॉ. दिलीप संघी, प्राचार्य हनुवते उपस्थित होते.
याप्रसंगी प्राचार्य हनुवते यांनी, सदर इमारतीत विद्यार्थ्यांचे कौशल्य वाढविण्याकरिता आवश्यक तांत्रीक बाबी पूर्ण करण्यात आले असून २२ हजार स्केअर फूट इमारतीत सर्वप्रकारच्या कार्यशाळेसह इंजीनियरिंग मेकेनिक्स, क्रॉक्रेट टॅक्नोलॉजी, फ्ल्युड पावर, स्पॉट वेल्डींग, एअर कडीशनरींग युटीएम उपलब्धतेसह विविध तांत्रिक पुरवठा करण्यात आले असल्याचे सांगीतले.खासदार पटोले यांनी, आधुनिक तंत्रकौशल्यामुळे विद्यार्थ्यांचे मनोबल उंचावत असून त्यांच्यातील कार्यक्षमता वाढत आहे. तंत्रकौशल्यामुळे विद्यार्थ्यांना रोजगाराचे संसाधन मिळणार आहे.विद्यार्थ्यांनी तंत्रशिक्षणाकडे अधिक भर देण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले.
खासदार नेते यांनी, प्रत्येक तालुक्यात तंत्रशिक्षणाची आवश्यकता असल्याचे सांगत, आदिवासी क्षेत्रातील विद्यार्थ्यांना याचा शैक्षणिक दृष्टीने लाभ होणार असल्याचे सांगीतले. प्रास्ताविक पंकज कटरे यांनी केले. आभार राहुल संघी यांनी मानले. कार्यक्रमाला शैक्षणिक संस्थेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी) इमारतीच्या लोकार्पण प्रसंगी खा. पटोले, आ.पुराम, संस्थापक मानकर व अन्य