लक्ष्य डोळ्यांसमोर ठेवल्यास यश हमखास मिळते :शिंदे

0
17
वाढदिवसाच्या शुभेच्छा

गोरेगाव : विद्यार्थी दशेपासूनच योग्य मार्गदर्शन, योग्य ध्येयाची निवड, सातत्य व निष्ठेने अभ्यास केल्यास जीवनातील सर्वोच्च लक्ष्य मिळतेच. विद्यार्थ्यांमधूनच पोलीस अधिकारी, डॉक्टर, इंजिनिअर, वकील व मंत्री घडतात, असे प्रतिपादन गोरेगावचे पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे यांनी केले.
जि.प. केंद्र शाळा मोहगाव येथील विद्यार्थ्यांना ते मार्गदर्शन करीत होते.
या वेळी त्यांनी तक्रार खोली, एफआयआर म्हणजे काय? कारागृह यांची माहिती दिली. विविध गुन्ह्यांचे स्वरुप व कलम सांगितले. गुन्हा सिद्ध झाल्याशिवाय कोणालाही अटक केली जात नाही. कारागृहात नेहमी वाईट वृत्तीचे अपराधी लोक येतात. आपण नेहमी सत्याच्या मार्गावर चालावे, असे आवाहनही शिंदे यांनी केले.
दरम्यान एके-४७, एसएलआर, पिस्तूल, इन्सास, कार्बाइड, मशीनगण, संगीन, काडतुसे यांची माहिती व रेंजविषयक मार्गदर्शन चालक शशीकांत जोगेकर यांनी केले. वाहतुकीच्या नियमांची माहिती व माहिती पुस्तिकेचे वाटप चंद्रकांत गुट्टे यांनी केले. प्रश्नोत्तरादरम्यान संवाद साधताना ठाणेदार कसे बनतात? आयपीएस व आयएएसमधील फरक कोणता? नक्षलवादी कसे असतात? पोलिसांना लोक का घाबरतात? असे विविध प्रश्न विद्यार्थ्यांनी विचारले.
याप्रसंगी ठाणेदार शिंदे, चालक जोगेकर, अशोक जायभाये, चंद्रकांत गुट्टे, मंजुषा घरडे, उईके हे कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक बी.सी.वाघमारे, शिक्षक अशोक चेपटे, टेकचंद भगत, बिट्ट लहाने, हिवराज थपाडे, अनिल मेश्राम, शालिनी बोपचे यांनी सहकार्य केले.