24.2 C
Gondiā
Friday, August 21, 2026
Home शैक्षणिक परशुराम विद्यालयात निरोप समारंभ

परशुराम विद्यालयात निरोप समारंभ

0
39

गोरेगाव,दि.२३ः  तालुक्यातील परशुराम विद्यालय मोहगाव बु. येथील वर्ग १०च्या विद्यार्थ्यांना वर्ग ९ वी च्या विद्यार्थ्याकडून “निरोप समारंभ” कार्यक्रमाचे आयोजित करुन निरोप देण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक बी.डब्लु.कटरे हे होते.कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून के.टी.पटले (से.नि.केंद्रप्रमुख मोहगाव बु.),.हूमराज जी बावनकर (सेवा.सह.अध्यक्ष मोहगाव बु.),चुन्नीलाल जी उपराडे तुमखेडा खुर्द,संपतजी जमदाड तुमखेडा खुर्द हे उपस्थित होते.सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे संचालन कु.भारती बिसेन(कटरे) यांनी केले, तर आभार प्रदर्शन पी.एम.चुटे यांनी मानले.याप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच इयत्ता ९ वी व १० वी चे विद्यार्थी उपस्थीत होते.