तुमसर,दि.24ः- तालुक्यातील प्राथमिक शाळांनी विद्यार्थी पटसंख्या वाढवून २६ लाखांची शासनाची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणाबाबत दोघा मुख्याध्यापकांसोबतच सचिवाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यामध्ये तालुक्यातील हसारा व देव्हाडी येथील शाळेच्या मुख्याध्यापकासंह शिक्षण संस्थासचिवांचा समावेश आहे.याप्रकरणात गुन्हा नोंदविण्यात आला असला तरी अद्यापही कुणालाच अटक करण्यात पोलीसांना यश आलेले नाही.
तुमसर तालुक्यातील हसरा येथे आदर्श ग्रामीण विकास विद्या प्रसारक मंडळाची आदर्श प्राथमिक शाळा आहे. या शाळेची २०११-१२ मध्ये विद्यार्थी पटसंख्या ३७ होती. मात्र शासकीय अनुदान लाटण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार करून त्याआधारे तब्बल 141 एवढी विद्यार्थी पटसंख्या वाढवण्यात आली. तसेच २ शिक्षकांची भरतीसुद्धा करण्यात आली. शासनाच्या विविध योजनेचा लाभ घेत तब्बल १५ लाख ८३ हजार रुपयांना शासनाला फसविण्यात आले. पट पडताळणी मोहिमेच्या वेळेस ही फसवणूक लक्षात आली. त्यानंतर संस्थेचे सचिव आर एस ठाकूर आणि मुख्याध्यापक एम एफ बिसेन यांच्या विरुद्ध तुमसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.