दिपीका व दिव्या १0 वर्षांनी चढल्या शाळेच्या पायर्‍या

0
12

आमगाव,दि.18 : कुटुंबाचे पालनपोषनार्थ रोजगाराच्या शोधात स्थलांतरीत होणाड्ढया सोनवाने कुटुंबातील दिपीका व दिव्याने तब्बल दहा वर्षानंतर शाळेच्या पायर्‍या चढला. तालुक्यातील ठाणा येथील जिल्हा परिषद शाळेच्या शाळाबाह्य मुले शोध मोहिमेतंर्गत त्यांना शाळेत शिकण्याची संधी मिळाली.
राज्य शासनाच्या शिक्षण हक्क कायद्याने सर्वांसाठी शिक्षणाची दारे खुली केली आहेत. यातंर्गत गोंदिया जिप शिक्षण विभागातर्फे शाळाबाह्य मुलांचा शोध घेऊन त्यांना शाळेत प्रवेशित करण्यात येत आहे. यातंर्गत ठाणा जिप वरिष्ठ प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक नरेंद्र बिसेन, शिक्षक कुवरलाल कारंजेकर, शशीकला प्रधान, मनीष शरणागत, गौरीशंकर पटले, गीता साठवणे, वैशाली वंसुले, अनिता मानकर तसेच गटसाधन केंद्राचे खुमेश कटरे, वशिष्ठ खोब्रागडे, केंद्रप्रमुख हरदुले हे ठाणा परिसरात शाळाबाह्य मुलांची शोध मोहिम राबवित होते. यादरम्यान रोजगाराच्या शोधार्थ ठाण्यात काही दिवसापासून वास्तव्यास असलेले सोनवाने कुटुंबाशी भेट झाली. यावेळी त्यांच्या दहा वर्षीय दिपीका व आठ वर्षीय दिव्या या शाळेत जात नसल्याचे आढळले. मुख्याध्यापक व शिक्षकांनी सोनवाने पालकांना मुलींच्या शिक्षण व पर्यायाने भवित्याचे महत्व पटवून देत दिपीका व दिव्याला वयानुरुप समकक्ष वर्गात प्रवेशित करुन घेतले. त्यामुळे जन्मानंतर प्रथमच शाळेत जाण्याचा आनंद दोघींच्या चेहर्‍यावर दिसून येत होता.