गोंदिया,दि.16ः महाराष्ट्र राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापकांचे राज्यस्तरीय शैक्षणिक संमेलन दि.१४ ते १५ डिसें.२०१९ या कालावधीत वर्धा येथे आयोजित करण्यात आलेले आहे.हे आयोजन राज्य व विदर्भ मुख्याध्यापक संघाच्या वतीने करण्यात आलेले आहे.या संमेलनात गोंदिया जिल्ह्यातील सर्वच प्रकारच्या व सर्व व्यवस्थापनाद्वारा संचालित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापकांना जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष मारोतराव खेडेकर यांनी केले.येथील फुंडे विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय फूलचूर येथे आयोजित जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या सभेत ते बोलत होते.
सभेच्या अध्यक्षस्थानी राज्य अध्यक्ष मारोतराव खेडेकर होते.याप्रसंगी विदर्भ मुख्याध्यापक संघाचे सचिव सतिश जगताप,नागपूर ग्रामीणचे अध्यक्ष विनय माटे,वर्धा जिल्ह्याचे कार्यवाह मनोहर बारस्कर,प्रदीप गोमासे,निंबालकर,विदर्भाचे उपाध्यक्ष रामसागर धावडे,गोंदिया जिल्ह्याचे अध्यक्ष रमेश तनवानी,गोंदिया जिल्ह्याचे कार्यवाह बी.डब्लु.कटरे,गोंदियाचे कार्याध्यक्ष दुर्गाप्रसाद पटले,विदर्भ प्रतिनिधी रजिया बेग,गोंदिया जिल्हा मार्गदर्शक खुशाल कटरे,गोंदिया जिल्हा उपाध्यक्ष सी.जी.पाऊलझगडे,जिल्हा उपाध्यक्ष जी.एम.येडे,जिल्हा उपाध्यक्ष बी.के.कोरे,जिल्हा संघटन सचिव प्रदीप नागदेवे,जिल्हा शैक्षणिक उपक्रम प्रमुख जे.बी.कटरे,भगिरथ जिवानी,जिल्हा महिला प्रतिनिधी बबीता भारद्वाज,जिल्हा मार्गदर्शक नरेन्द्र भरने,गोरेगाव तालुका अध्यक्ष संजय बघेले,आमगाव/सालेकसा तालुका अध्यक्ष देवेंद्र मच्छिरके,गोरेगाव तालुका कार्यवाह आर.वाय.कटरे, गोंदिया तालुका कार्यवाह डी.बी.गेडाम उपस्थित होते.
या बैठकीत आरटीई कायदा वेशीवर टांगून जिल्हापरिषद व्यवस्थापनाने गोंदिया जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात अनाधिक्रृतपणे उघडलेल्या इयत्ता ५ वी व ८वी च्या तुकड्या तात्काळ बंद करणे.गोंदिया जिल्ह्यासह राज्यात शिक्षकांची समायोजन प्रक्रिया बंद झालेली आहे, अशा परिस्थितीत शाळाना रिक्त जागावर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारीची पदे भरण्याची परवानगी देण्यात यावी.शाळा इमारत कर व विद्युत भाडे तात्काळ बंद करण्याबाबद,गोंदिया जिल्ह्यातील माध्य.व उच्च माध्य.शाळेत कार्यरत कर्मचारीचा आयकर भरणा करण्याची व्यवस्था तालुकास्तरावर उपलब्ध असलेल्या बँकेत करण्यात यावी.गोंदिया जिल्ह्यासह राज्यातील अंश:अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी जर अतिरिक्त झाले तर त्यांचे पुढील समायोजन होत पर्यंत त्यांना त्याच शाळेतून वेतन सातत्य कायम ठेवण्यात यावे याव चर्चा करण्यात आली.या सभेचे संचालन गोंदिया जिल्हा कार्यवाह बी.डब्लु.कटरे यांनी तर आभार प्रदर्शन गोंदिया जिल्हा अध्यक्ष रमेश तनवानी यांनी केले.





