तिरोडा,दि.१३ः-सावित्रीबाई फुले जयंती निमित्त महिलांचे क्रीडासत्र व सांस्कृतीक कार्यक्रम संत गाडगेबाबा व माऊली ग्रामसंस्थेच्या माध्यमातून मेंढा येथे घेण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून ग्रामसंस्थेच्या अध्यक्ष रशिला चौधरी होत्या. अध्यक्षस्थानी सरपंच गौरी टेंभरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक अंबुले, नलू मॅडम, आदमने, राऊत, बबीता बिसेन उपस्थित होते.यावेळी महिलांचे सांस्कृतीक कार्यक्रम व कब्डडी,खो-खो, संगीत खुर्ची, कार्यक्रमातील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. प्रास्ताविक सुनीता सुरसाऊत यांनी केले. संचालन नंदेश्वरी बिसेन तर आभार कविता बिसेन यांनी मानले.





