गोरेगाव,दि.16ः – स्थानिक किरसान मिशन स्कूल व जुनिअर कॉलेज गोरेगाव येथे अविष्कार स्नेह संमेलन थाटात पार पाडले. कार्यक्रमाचे उदघाट्न पोलीस निरिक्षक सुरेश नारनवरे यांच्या हस्ते संस्थापक डाॅ.नामदेव किरसान यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
स्नेह संमेलनातुन विविध सुप्त गुणांचा व विदयार्थ्यांना त्यांचा आवडीच्या कृतिमध्ये भाग घेता येतो त्यामुळे त्याच्या सर्वागीण विकास होतो असे श्री. नारनवरे यांनी सांगितले. त्याच प्रमाणे डॉ. किरसान यांनी जीवनात यशस्वी व सर्वागीण विकासासाठी विद्यार्थ्यांना इतर पाठ यपूरक कार्यक्रम व आवडत्या कौशलीक कृती स्नेहसंमेलनाच्या माध्यमाने पूर्ण होतात असे म्हटले.प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉ. विनोद उके, यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांगून स्नेहसंमेलन विद्यार्थ्यांसाठी त्यांची अभीवृत्ती व अभींरुची विकासात पोषक ठरते. यावेळी शिक्षिका लक्ष्मी चौरेशिया, पुष्पलता सोनवणे, माधुरी गोदुले, गोदावरी डोहळे, ज्ञानेशोरी पटले, सुनील रहांगडाले, मीरा साठवणे, सरिता चिपे, माधुरी बघेले, मंगला जांभुळकर, ममता चौधरी, छाया हरिणखेडे, गीता जागणित प्रमोद रहांगडाले, केशव मेश्राम, कुणाल बोरकर, काजल बोरकर, गणेश चौधरी, खिलेश सोनवणे, हर्षा ठाकरे,. माईकल सिहारे, आर. आर. कटरे, सचिन रामटेके, धर्मेंद्र राऊत, उपस्थित होते.





