स्वतःच्या कृतीतून तयार केलेले महापुरुषांचे पुस्तकें दिली भेट;स्तुत्य उपक्रमाची सर्वत्र चर्चा
भंडारा,दि.16: समाजशास्त्राचे शिक्षण घेणारे व न्यूज़ प्रभातमध्ये वृतांकन करणारे युवा कवि देवेंद्र रहांगडाले यांनी आपला 22 वा वाढदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा केला. भंडारा येथून 10 किलोमीटर अंतरावर स्थित बापु बालकश्रम येथील विद्यार्थ्यांना वाढदिवसानिमित्त थोर महापुरुषांचे परिवर्तन मार्गदर्शक वैचारिक पुस्तक भेट दिले. तसेच स्पर्धा परीक्षेविषयी मार्गदर्शन केले.रहांगडाले हे मूळचे गोरेगाव तालुक्यातील कमरगाव या गावचे रहिवासी आहेत.पदवूत्तर शिक्षणासाठी भंडारा येथे वास्तव्यास आहेत.यावेळी बापु बालकाश्रम येथील पंकज सुखदेवे, स्नेहा भालाधरे, अश्विनी हुमणे, राहुल बांते, विशाल मरकाम, शुभम मालवे, रोहित कावळे, जितेंद्र मांडारकर , प्रियेश क्षीरसागर , जतीन खोटेले अमिता राऊत, पूजा वाघमारे, कल्याणी वंजारी सह अन्य मित्र मंडळीकडून देवेंद्रचे अभिनंदन करण्यात आले.




