आमगाव दि.03ः :: तालुक्यातील कातुर्ली येथील जिवनज्योती माध्यमीक विद्यालयाचे मुख्याध्यापक भोजेंदकांत डोये सेवानिवृत्त झाले. त्यांचा सपत्नीक सत्कार शाळेच्या वतीने ३१ जानेवारी रोजी पार पडला. श्री डोये यांनी प्रदीर्घ काळ या शाळेत सेवा दिली. सेवानिवृत्ती सोहळ्याला सरपंच केशरीचंद बिसेन, उपसरपंच रामलाल दोनोडे, डॉ. सिताराम कोरे, चुन्नीलाल शहारे, आय. एन. कटरे, यशवंतराव बावनकर, प्रकाश कोरे, डॉ. विजय कोरे, श्री चचाणे, तुळशीराम पाथोडे, मुन्नालाल मेश्राम, एस. एन. शेंडे, एम. के. डोंगरवार आदींची उपस्थिती होती. दरम्यान शाळेच्या वतीने श्री डोये यांचा शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देवून सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. सिताराम कोरे म्हणाले, श्री डोये यांच्यामुळे जिवनज्योती विद्यालय ओळखण्यात येते. त्यांची प्रदीर्घकाळ सेवा या गावाला लाभली असून त्यांनी घडविलेले विद्यार्थी मोठ्या पदावर गेले आहेत. शिस्तप्रीय आणि मनमिळावू व्यक्तीमत्व म्हणून श्री डोये यांची ओळख आहे. वयोमानामुळे ते सेवानिवृत्त झाले असून त्यांचे कार्य नेहमीत स्मरणात राहिल, असे ते म्हणाले. श्री डोये म्हणाले, कातुर्ली गावाने भरभरून प्रेम दिले. विद्यार्थी आणि पालक यांनी आपल्यावर विश्वास ठेवला. त्यांचे प्रेम कधीही विसरू शकणार नाही. शाळा किंवा गावाला आपली मदत लागल्यास सेवानिवृत्तीनंतर देखील तत्पर असेल, असे ते म्हणाले. संचालन एम. के. डोंगरवार यांनी केले. आभार एस. एन. शेंडे यांनी मानले. यशस्वितेकरिता के. पी. शहारे, पी. ए. खोब्रागडे, एस. एम. मलेवार, एस. एम. बागडे यांनी परिश्रम घेतले.





