39.4 C
Gondiā
Sunday, June 21, 2026
Home शैक्षणिक विदर्भ अर्थशास्त्र परिषदेमध्ये प्रा.डॉ.नरेश इंगळे यांचा सत्कार

विदर्भ अर्थशास्त्र परिषदेमध्ये प्रा.डॉ.नरेश इंगळे यांचा सत्कार

0
58
अंजनसिंगी,दि.04ः.मोर्शी येथील भारतीय महाविद्यालयात आयोजित दोन दिवसीय विदर्भ अर्थशास्त्र परिषदेच्या समारोपीय कार्यक्रमात संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची आचार्य (पी. एच.डी.) पदवी प्राप्ती आणि यूजीसी निर्देशित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाद्वारा आयोजित राज्यस्तरीय पात्रता (सेट)परीक्षा उत्तीर्ण केल्याबद्दल प्रा.डॉ.नरेश शं.इंगळे यांचा स्मृतीचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन विदर्भ अर्थशास्त्र परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ. निवृत्ती पिस्तुलकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी डॉ.मृणालिनी फडणवीस (कुलगुरू-अहिल्याबाई होळकर विद्यापीठ सोलापूर) होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून अर्थतज्ज्ञ डॉ.श्रीनिवास खांदेवाले,डॉ. आर.वाय.माहोरे,डॉ.दि.व्य. जहागीरदार,डॉ.मुक्ता जहागीरदार,प्राचार्य,डॉ.सुरेश बिजवे,संगाबा अमरावती विद्यापीठ अर्थशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा.डॉ.संतोष कुटे,विदर्भ अर्थशास्त्र परिषद उपाध्यक्ष प्रा.डॉ.राजेश बुरंगे,नवनिर्वाचित अध्यक्ष प्रा.डॉ.विनोद गावंडे,उपाध्यक्ष प्रा.डॉ.प्राची पांडे,प्रा.डॉ.दिपक शृंगारे,डॉ.संदिप म.राऊत आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती.सूत्रसंचालन परिषद सचिव प्रा.डॉ.विठ्ठल घिनमिने,व प्रा.डॉ. राजेश चव्हाण यांनी केले तर उपस्थिताचे आभार स्थानिक सचिव डॉ. लाजवंती टेंभुरणें यांनी मानले.कार्यक्रमाला संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, राष्ट्संत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर,गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली,या तिन्ही विद्यापीठ अंतर्गत महाविद्यालयाचे प्राध्यापक,संशोधक विद्यार्थी बहुसंख्येने आवर्जून उपस्थित होते.