39.4 C
Gondiā
Sunday, June 21, 2026
Home गुन्हेवार्ता उभ्या पिकअप गाडीला झायलोची धडक 2 ठार

उभ्या पिकअप गाडीला झायलोची धडक 2 ठार

0
47

भंडारा,दि.04ः- शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर भीलेवाड़ा पेट्रोल पंपाजवळ उभ्या असलेल्या पिकअप वाहनाला भरधाव वेगात आलेल्या झायलोच्या चालकांने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघेठार झाल्याची घटना आज मंगळवारला सकाळी घडली.सविस्तर असे की,पिक गाडीचा पंचर टायर दुरुस्त करीत असलेला गाडीच्या ड्राइवर,क्लीनरला मागून आलेल्या भरधाव झायलो गाडीने धड़क देत फरफटत नेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.या घटनेत झायलो गाडी रस्त्याच्या कडेला पलटल्याने गाडीतील 4 जण जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.तर मृत ड्रायवर व क्लिनर यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात हलविण्यात आले.या घटनेनंतर तणावाची स्थिती निर्माण होऊन काही तासासाठी राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुक खोळबंली होती.